कोरोनाकाळातील खर्च पंधरा दिवसांत सादर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:17 IST2021-02-05T05:17:22+5:302021-02-05T05:17:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरातील कोरोना आपत्ती अद्याप संपली नसली तरी, ६७/३ क अंतर्गत केलेल्या सर्व खर्चाचा ...

कोरोनाकाळातील खर्च पंधरा दिवसांत सादर करा
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील कोरोना आपत्ती अद्याप संपली नसली तरी, ६७/३ क अंतर्गत केलेल्या सर्व खर्चाचा तपशील प्रशासनाने पंधरा दिवसांत सादर करावा, असे आदेश स्थायी समितीने दिले असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सांगितले़
कोरोना आपत्तीचा प्रभाव मोठ्या प्रमाणात असताना मार्च २०२० अखेरपासून पुढील तीन-चार महिन्यांत साधारणत: तीनशे कोटी रुपये खर्च झाल्याचे सांगण्यात आले आहे़ यापैकी बहुतांशी खर्च हा अत्यावश्यक बाब म्हणून ६७/३ क खाली आयुक्तांच्या अधिकारात केली़ यामध्ये क्वारंटाइन सेंटर उभारणे, वैद्यकीय उपकरणे खरेदी करणे, विविध बिले आदींवर कोट्यवधी रुपये खर्च केले़ हे सर्व खर्च येत्या पंधरा दिवसांत प्रशासनाने स्थायी समिताला सादर करण्याबाबत आदेश दिले आहेत़
दरम्यान, जम्बो हॉस्पिटलला महापालिकेने ५० कोटी रुपये देण्याबाबतचे नियोजन होते, पण प्रत्यक्षात ३२ कोटी रूपये अदा केले असून, इतर वैद्यकीय सेवा मात्र महापालिकेकडून दिला आहे़ त्यामुळे याचाही तपशील मागविला आहे़
---
एक हजार हरकती प्राप्त
६ मीटरचे रस्ते ९ मीटर करण्याबाबत शहरातील ३५० रस्त्यांबाबत हरकती व सूचना महापालिकेकडून मागविल्या होत्या़ यामध्ये एकूण १ हजार हरकती प्राप्त झाल्या असून, या हरकतींची छाननी करून, त्याबाबत सुनावणी होईल, अशी माहिती रासने यांनी दिली़ तर सरसकट ९ मीटरचे रस्ते न करता जेथे नागरिकांचा नकार आहे तेथे हा निर्णय घेतला जाणार नाही़ नागरिकांच्या सूचनांनुसार व आवश्यकतेनुसारच ६ मीटरचे रस्ते ९ मीटर करण्याबाबतचे निर्णय घेतले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले़