जातप्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव ३० जूनपूर्वी सादर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:14 IST2021-06-09T04:14:13+5:302021-06-09T04:14:13+5:30
पुणे जिल्ह्यातील महाविद्यालयांनी आपल्या स्तरावरून इयत्ता बारावीमध्ये विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना अर्ज सादर करण्याबाबत सूचित करावे. त्याचप्रमाणे दिलेल्या मुदतीत अर्ज ...

जातप्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव ३० जूनपूर्वी सादर करा
पुणे जिल्ह्यातील महाविद्यालयांनी आपल्या स्तरावरून इयत्ता बारावीमध्ये विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना अर्ज सादर करण्याबाबत सूचित करावे. त्याचप्रमाणे दिलेल्या मुदतीत अर्ज प्राप्त न झाल्यास व जात प्रमाणपत्र न मिळाल्यास होणाऱ्या शैक्षणिक नुकसानीस संबंधित विद्यार्थी व्यक्तिशः जबाबदार राहील, याची नोंद घ्यावी, असेही ढगे यांनी परिपत्रकाव्दारे स्पष्ट केले आहे.
राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत अनेक व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यापूर्वी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असते. त्यामुळे इयत्ता बारावीमधील विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या व व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी ३० जूनपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावा. त्याचप्रमाणे अर्जाची प्रिंट आउट व आवश्यक कागदपत्रांसह समितीच्या कार्यालयात जमा करून त्याची पोहोच पावती घ्यावी, असेही परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.