आरोपीच्या जामिनासाठी खोटी कागदपत्रे न्यायालयात सादर

By Admin | Updated: April 29, 2017 03:55 IST2017-04-29T03:55:44+5:302017-04-29T03:55:44+5:30

अवैधरित्या दारूविक्री गुन्ह्यामध्ये अटक असलेल्या आरोपीच्या जामीनासाठी खोटे कागदपत्रे कोर्टासमोर सादर केल्यामुळे एक जणास

Submission of false documents to the accused in the court | आरोपीच्या जामिनासाठी खोटी कागदपत्रे न्यायालयात सादर

आरोपीच्या जामिनासाठी खोटी कागदपत्रे न्यायालयात सादर

दावडी : अवैधरित्या दारूविक्री गुन्ह्यामध्ये अटक असलेल्या आरोपीच्या जामीनासाठी खोटे कागदपत्रे कोर्टासमोर सादर केल्यामुळे एक जणास खेड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण येथे (आळंदी चौक) येथे अवैध्यरित्या दारूविक्री प्रकरणी एका महिलेला (९ डिसेंबर २०१६ ) पोलिसांनी अटक केली होती. तिला जामीनासाठी त्यांच्या साथीदारांनी एच. डी. देशिंगे यांच्या न्यायालयात खोटे सातबारा उतारे, प्रतिज्ञापत्र व खोटी कागदपत्रे सादर करून जामीन मिळवला होता. न्यायालयाने सदर जामीनाची कागदपत्राची पडताळणी केली असता ही सर्व कागदपत्रे खोटी असल्याचे निष्पन्न झाले असल्यामुळे या जामीनदारावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. खेड तालुक्यात खोटे जामीन देणारी टोळी सक्रीय असून असे खोटे जामीन दिलेले इतरही गुन्हे बऱ्याच लोकांवर दाखल होण्याची शक्यता आहे, असे खेड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक मुख्तार शेख यांनी सांगितले. (वार्ताहर)

Web Title: Submission of false documents to the accused in the court