शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
4
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
5
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
6
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
7
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
8
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
9
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
10
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
11
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
12
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
13
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
14
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
15
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
16
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
17
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
18
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
19
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
20
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 

पार्थ पवार जमीन प्रकरणी दुय्यम निबंधक निलंबित; अवघ्या ५०० रुपयांत स्टॅम्पपेपरवर करार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 12:30 IST

हिंमत असेल तर अजित पवारांवर कारवाई करा: अंजली दमानिया

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या तीनशे कोटींच्या ४० एकर जमीन नोंदणी प्रकरणात सहा कोटी रुपयांचा सेस न घेतल्याबद्दल दुय्यम निबंधक रवींद्र तारू यांचे राज्य सरकारने निलंबन केले आहे.  दरम्यान, या प्रकरणी फक्त अधिकाऱ्यांनाच बकरे बनवू नका. हिंमत असेल तर कारवाई उपमुख्यमंत्री अजित पवारांवर करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे.

मुंढवा येथील  १६.१९ हेक्टर भूखंड खरेदीचा व्यवहार २० मे रोजी झाला. अमेडिया इंटरप्रायझेस एलएलपीचे भागीदार दिग्विजय  पाटील यांनी ही खरेदी केली. खरेदीदारांनी लेटर ऑफ इंटेंट आयटी दर्शविले. त्यामुळे या व्यवहाराला मुद्रांक शुल्क लागले  नाही. मात्र, दुय्यम निबंधक तारू यांनी एक टक्का स्थानिक संस्था कर आणि एक टक्का मेट्रो कर (सेस) असे सुमारे सहा कोटी रुपयांचे मुद्रांक घेतले नाही. तारू यांच्यावर कारवाई करावी, अशी शिफारस प्रभारी नोंदणी महानिरीक्षक सुहास दिवसे यांनी राज्य सरकारकडे केली होती.

अवघ्या ५०० रुपयांत स्टॅम्पपेपरवर करार

छत्रपती संभाजीनगर : पुण्यातील कोरेगाव पार्क येथील १८०० कोटी रुपयांची महार वतनाची ४० एकर जमीन पार्थ पवार यांच्या कंपनीला केवळ तीनशे कोटी रुपयांत देण्यात आली. हा व्यवहार केवळ ५०० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर कसा करण्यात आला, असा सवाल उद्धवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी केला. अजित पवार यांची हकालपट्टी करण्याचे धाडस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवावे, असे आव्हान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले आहे.

जागेशी एमआयडीसीचा संबंध नाही: सामंत

रत्नागिरी : पुणे - कोरेगाव परिसरात आयटी पार्क करण्यासाठी मे. अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपी कंपनीला सूट दिल्याचे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळावर आरोप करण्यात येत आहेत. संबंधित जागा आणि औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेचा काहीही संबंध नाही, असे स्पष्टीकरण राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले.

मला जो न्याय तोच अजित पवार यांना: एकनाथ खडसे

जळगाव: भोसरी जमीन खरेदी प्रकरणात माझ्या नातेवाइकांनी स्वस्तात जमीन घेतल्याप्रकरणी माझ्यावर आरोप झाल्यानंतर आपण राजीनामा दिला होता. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुलाने बेकायदेशीर व्यवहार करून जमीन घेतल्याचा आरोप होत असल्याने त्यांनीही नैतिकता दाखवून चौकशी होईपर्यंत उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांनी पत्रकारांशी बोलताना केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Official Suspended in Parth Pawar Land Case; Cheap Stamp Paper?

Web Summary : A sub-registrar was suspended for not collecting dues in Parth Pawar's land deal. Anjali Damania demands action against Ajit Pawar. Opposition leaders question the deal's legality and demand resignations. Uday Samant denies MIDC involvement. Eknath Khadse calls for Pawar to resign pending investigation.
टॅग्स :parth pawarपार्थ पवारAjit Pawarअजित पवार