चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांचे होणार स्वागत
By Admin | Updated: June 16, 2014 08:15 IST2014-06-16T08:15:45+5:302014-06-16T08:15:45+5:30
या शुल्कात थोडी वाढ झाल्याचे पालकांनी सांगितले

चॉकलेट देऊन विद्यार्थ्यांचे होणार स्वागत
विद्यार्थ्यांची ने- आण करण्यासाठी संबंधित शाळेच्या रिक्षावाल्या काकांशी पालकांनी चर्चा केली. महिन्याचे शुल्क ठरवून विद्यार्थ्याला वेळेत शाळेत पोहोचविणे आणि शाळा सुटल्यानंतर घरी आणून सोडण्याच्या वेळा ठरविण्यात आल्या. या शुल्कात थोडी वाढ झाल्याचे पालकांनी सांगितले. याच पद्धतीने व्हॅन व मिनी बसमधूनही विद्यार्थ्यांची ने-आण केली जाते. काही खासगी शाळांनी या प्रकारच्या बस उपलब्ध करून दिल्या आहेत. शालेय वार्षिक शुल्कामध्ये या भाड्याच्या रकमेचा समावेश केला जातो. ■ यंदाच्या वर्षापासून सेमी इंग्रजी माध्यमाच्या नव्या शाळा सुरू करण्यात येणार आहेत. शहरातील विविध ठिकाणी अशा एकूण ५0 शाळा सुरू करण्यात येणार आहे. विद्यार्थी व पालकांचा कल लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थिसंख्या घटण्याचे प्रमाण रोखण्यास मदत होणार आहे. आचारसंहितेत अडकला गणवेश, दप्तर, रेनकोट, बूट
■ महापलिका शाळेतील विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पाठपुस्तके वाटली जाणार आहेत. मात्र, गणवेश, पीटीचा गणवेश, दप्तर, कंपास, रेनकोट, बूट व सॉक्स आदी साहित्य वाटप करता येणार नाही. पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता असल्याने या साहित्याचे वाटप करण्यास अडचणी येत आहेत. आयुक्त राजीव जाधव यांच्याशी चर्चा करून लवकरच त्यावर तोडगा काढला जाणार असल्याचे सभापती फजल शेख यांनी सांगितले. पिंपरी : सुमारे दोन महिन्यांच्या उन्हाळी सुटीनंतर सोमवारपासून शाळा सुरू होत आहेत. ढोल-ताशाच्या निनादात विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प व चॉकलेट देऊन जंगी स्वागत करण्यात येणार आहे. शाळेच्या पहिल्या दिवसाच्या स्वागतासाठी शिक्षक वर्गात उत्साह संचारला आहे.
उन्हाळी सुटीचा मनसोक्त आनंद विद्यार्थ्यांनी लुटला. सोमवारी शाळेचा पहिला दिवस आहे. शासनाच्या आदेशाप्रमाणे शिक्षक हक्क कायद्यांतर्गत १६ जून हा दिवस प्रवेश उत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे. शाळेची स्वच्छता करून आवश्यकतेप्रमाणे रंगरंगोटी केली गेली आहे. शाळेच्या व्हरांड्यात व वर्गासमोर रांगोळी घालून रंगीबेरंगी पताका लावल्या जाणार आहेत.
नव्या वर्गात पाऊल ठेवण्याच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे जंगी स्वागत केले जाणार आहे. ढोल-ताशाच्या निनादात प्रभात फेरी काढली जाणार आहे. गुलाबपुष्प व चॉकलेट देऊन शिक्षक त्यांचे हास्यमुद्रेने स्वागत करणार आहेत.
महापालिकेच्या प्रत्येक शाळेत स्थानिक नगरसेवक, प्रतिष्ठित नागरिक, पालक समितीचे प्रमुख व मुख्याध्यापक हे आवर्जून उपस्थित राहतील. पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना पाठपुस्तके वाटली जाणार आहेत. प्रातिनिधिक स्वरूपात शहरातील तळवडे, दिघी, थेरगाव संकुल व भूमकरवस्ती येथील बालवाडीतील बालकांचे स्वागत महापालिकेच्या पदाधिकारी व अधिकार्यांमार्फत केले जाणार आहे. शालेय पोषण आहारासाठी सामग्री गोळा केली आहे. पहिल्या दिवशी दुपारच्या मध्यान्ह भोजनात गोड भाताचा आहार असणार आहे.
महापालिकेच्या मराठी माध्यमाचा १७ व उर्दू माध्यमाच्या १ असा एकूण १८ माध्यमिक शाळेत एकूण ९ हजार ९७२ विद्यार्थी आहेत. क्रीडा प्रबोधिनी विद्यालय १ आहे. प्राथमिक विभागाच्या एकूण १३६ शाळा आहेत. मराठी माध्यमाच्या ११९, हिंदीच्या ३, उर्दूच्या १२ व इंग्रजी माध्यमाच्या २ शाळा आहेत. एकूण ४९ हजार ३७0 विद्यार्थी आहेत. एकूण २१0 बालवाड्या असून, एकूण ६ हजार ६४७ बालक आहेत. या सर्वांचे मोठय़ा उत्साहात स्वागत केले जाणार आहे. एकही बालक शिक्षणापासून वंचित राहणार यासाठी दोन दिवस शाळेच्या परिसरात प्रभात फेर्या काढून जनजागृती करण्यात आली, असे महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे सभापती फजल शेख यांनी दिली. उद्याच्या प्रवेशोत्सवात नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
खासगी शाळामध्येही स्वागत
खासगी शाळामध्येही विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत केले जाणार आहे. गुलाबपुष्प व मिठाई देऊन पहिल्या दिवस गोड करण्यात येणार आहे. ढोल, ताशा व लेझीम पथकाद्वारे उत्साहात स्वागत केले जाणार आहे. (प्रतिनिधी)