शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही :राज्य मंडळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 20:07 IST

पुणे : बीड येथील गटसाधन केंद्रात दहावी व बारावीच्या परीक्षेतील १४२० उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जळाल्या आहेत, त्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही असे राज्य मंडळाच्या अध्यक्षा शंकुतला काळे यांनी स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्दे बीड येथील गटसाधन केंद्रात दहावी व बारावीच्या परीक्षेतील १४२० उत्तरपत्रिका जळून खाक झाल्याया परिस्थितीमध्ये मंडळाकडून निश्चित करण्यात आलेल्या गोपनीय पध्दतीने विद्यार्थ्यांना त्या विषयाचे गुण दिले जाणार आहेत

दहावी-बारावी उत्तरपत्रिका जळीत प्रकरणपुणे : बीड येथील गटसाधन केंद्रात दहावी व बारावीच्या परीक्षेतील १४२० उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जळाल्या आहेत, त्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही असे राज्य मंडळाच्या अध्यक्ष शंकुतला काळे यांनी स्पष्ट केले आहे. या परिस्थितीमध्ये मंडळाकडून निश्चित करण्यात आलेल्या गोपनीय पध्दतीने विद्यार्थ्यांना त्या विषयाचे गुण दिले जाणार आहेत, तरी त्यांनी निश्चिंत होऊन पुढील पेपर द्यावेत असे आवाहन काळे यांनी केले आहे.   शनिवारी बारावीचा गणिताचा तर दहावीचा द्वितीय भाषा उर्दू आणि होकेशनल या विषयांचे पेपर झाले. त्याच्या विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या उत्तरपत्रिका गट साधन केंद्रात ठेवण्यात आल्या होत्या. रविवारी सायंकाळी अचानक याठिकाणी आग लागून बारावीच्या ११९९ तर दहावीच्या २२१ उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या आहेत. याप्रकरणाची गंभीर दखल राज्य मंडळाकडून घेण्यात आली आहे.  याठिकाणी जाणीवपूर्वक आग लावून उत्तरपत्रिका जाळण्यात आल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. त्याचबरोबर उत्तरपत्रिका सांभाळण्याची जबाबदारी असलेल्या व्यक्तींच्या लक्षात हा प्रकार कसा आला नाही याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यापार्श्वभुमीवर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून या मागच्या कारणांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. त्यांचा तपास पूर्ण झाल्यानंतरच पुढे काय कारवाई करायची याबाबतचा निर्णय राज्य मंडळाकडून घेतला जाईल, असे शंकुतला काळे यांनी सांगितले. परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे हित जपण्याला सध्या प्राधान्य दिले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बीडमधील वसंत महाविद्यालय (केज), सरस्वती कनिष्ठ महाविद्यालय (केज), रामराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय (केज), पुरुषोत्तमदादा सोनवणे कनिष्ठ महाविद्यालय सारणी (आनंदगाव), काळेगाव कनिष्ठ महाविद्यालय काळेगाव घाट, श्याम कनिष्ठ महाविद्यालय दहिफळ (वडमाऊली), युसूफवडगाव कनिष्ठ महाविद्यालय, युसूफवडगाव, जीवन प्रगती कनिष्ठ महाविद्यालय, (नांदूरघाट) आदी परीक्षा केंद्रांमधील बारावी विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या आहेत. दहावीतील विद्यार्थ्यांच्या केंद्रांची निश्चित माहिती समजू शकलेली नाही. 

टॅग्स :PuneपुणेBeedबीडVinod Tawdeविनोद तावडेStudentविद्यार्थी