शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

पुस्तकातले प्रयाेग प्रत्यक्ष करुन पाहण्याची विद्यार्थ्यांना संधी ; पुणे विद्यापीठाचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 20:14 IST

शाळेत शिकवले जाणारे विज्ञानातील प्रयाेग प्रत्यक्षात करुन पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सायन्स पार्कतर्फे विद्यार्थ्यांसाठी वैज्ञानिक प्रयाेगांची विशेष सुविधा उपलब्ध करण्यात अाली अाहे.

पुणे :  विद्यार्थ्यांना शालेय जीवनात शिकवले जाणारे विज्ञानातील प्रयाेग हे प्रत्यक्षात करुन पाहण्याची संधी क्वचितच मिळत असते. परंतु सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सायन्स पार्कच्यावतीने इयत्ता पाचवी अाणि सहावीच्या विद्यार्थ्यांना ही संधी मिळणार असून विद्यापीठात या विद्यार्थ्यांसाठी वैज्ञानिक प्रयाेगांची विशेष सुविधा उपलब्ध करण्यात अाली अाहे. प्रयाेगशीलतेतून विज्ञान शिका अशी संकल्पना घेऊन सुरु हाेत असलेल्या या अभ्यासक्रमासाठी दाेन स्वतंत्र गट असणार अाहेत. या अंतर्गत 20 सत्र असणार असून दर अाठवड्याला 2 तासाचे एक सत्र घेण्यात येणार असल्याची माहिती सायन्स पार्क विभागाच्या वतीने देण्यात अाली अाहे. 

    विद्यापीठाच्या सायन्स पार्कच्या या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शालेय जीवनात शिकवले जाणारे विज्ञान हे प्रत्यक्ष प्रयाेग करुन बघण्याची संधी मिळणार असून त्यांना विज्ञान चांगल्या पद्धतीने समजण्यास मदत हाेणार अाहे. या नव्या गटांमधील विद्यार्थ्यांना वैज्ञानिक प्रयाेगशाळेत अनेक नवीन प्रयाेग स्वतः करायला मिळतील, तसेच त्यांच्या मनातील शंका अाणि विविध प्रश्न विचारुन तज्ज्ञांसाेबत चर्चादेखील करता येणार अाहे. शाळेच्या वेळेनुसार तसेच परीक्षेच्या वेळापत्रकानुसार या दाेन्ही बॅचच्या वेळा ठरविण्यात येणार अाहेत. 15 जुलै 2018 ते जानेवारी 2019 पर्यंत हे सत्र सुरु राहणार अाहेत. मराठी अाणि इंग्रजी भाषेत सुरु राहणाऱ्या अभ्यासक्रमात शालेय अभ्यासक्रमाचा विचार करण्यात अाला अाहे. 

    विद्यापीठाच्या सायन्स पार्कमध्ये मांडण्यात अालेल्या प्रयाेगशाळेत 500 हून अधिक वैज्ञानिक प्रयाेग, लहान माेठी उपकरणे व संच उपलब्ध अाहेत. या 20 सत्रांकरिता विद्यापीठाकडून प्रवेश शुल्क अाकारण्यात येणार अाहे. विद्यार्थ्यांना 18 जून 2018 पर्यंत नावनाेंदणी करता येणार अाहे. अधिक माहिती http://sciencepark.unipune.ac.in/events/या लिंकवर उपलब्ध अाहे.

टॅग्स :PuneपुणेPune universityपुणे विद्यापीठscienceविज्ञानStudentविद्यार्थी