शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

लोणी काळभोर येथील एमआयटीच्या विद्यार्थ्यांना गुलाबजाम पावडरमुळे त्रास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2018 20:50 IST

विद्यापीठातील मेसमध्ये एक हजारांहून अधिक विद्यार्थी दररोज जेवण करतात. मंगळवारी (दि. २८) दुपारी नेहमीप्रमाणे जेवणानंतर सधारणत: ४५ ते ५० विद्यार्थ्यांना पोट दुखणे आणि उलट्यांचा त्रास होऊ लागला.

ठळक मुद्देसंबंधित विद्यार्थांना उपचारासाठी संस्थेच्या विश्वराज हॉस्पीटलमध्ये दाखल मेसमध्ये वापरण्यात आलेल्या गुलाबजामच्या पावडरमुळे विद्यार्थ्यांना त्रास झाल्याचा प्राथमिक अंदाजविद्यापीठ प्रशासनातर्फे झालेल्या प्रकाराची चौकशी करण्यासाठी समिती

पुणे : लोणी काळभोर येथील एमआयटी-आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठातील मेसमध्ये गुलाबजाम पावडरमुळे विद्यार्थ्यांना त्रास झाल्याचा अंदाज संस्थेने व्यक्त केला आहे. या पावडरची पाकिटे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आली असून या प्रकाराच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आल्याची माहिती विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. मंगेश कराड यांनी दिली.विद्यापीठातील मेसमध्ये एक हजारांहून अधिक विद्यार्थी दररोज जेवण करतात. मंगळवारी (दि. २८) दुपारी नेहमीप्रमाणे जेवणानंतर सधारणत: ४५ ते ५० विद्यार्थ्यांना पोट दुखणे आणि उलट्यांचा त्रास होऊ लागला. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने संबंधित विद्यार्थांना उपचारासाठी संस्थेच्या विश्वराज हॉस्पीटलमध्ये दाखल केले. यातील उलट्या आणि जुलाब झालेल्या ५ ते ७ विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचार करून १२ तास निरक्षणासाठी हॉस्पीटलमध्येच ठेवण्यात आले. तर उर्वरित विद्यार्थ्यांना प्राथमिक उपचार करून सोडण्यात आले. सध्या सर्व विद्यार्थी सुखरूप आहेत, अशी माहिती डॉ. कराड यांनी दिली. मेसमध्ये वापरण्यात आलेल्या गुलाबजामच्या पावडरमुळे विद्यार्थ्यांना त्रास झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या गुलाबजाम पावडरची पाकिटे तपासणीसाठी प्रयोगशाळेमध्ये पाठविण्यात आली आहेत. विद्यापीठ प्रशासनातर्फे झालेल्या प्रकाराची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे डॉ. कराड यांनी सांगितले.  

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरmitएमआयटीStudentविद्यार्थीhospitalहॉस्पिटलfoodअन्न