विद्यार्थिनींनी शिक्षणातून आत्मनिर्भर व्हावे : प्रा. नीता डोंगरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:11 IST2021-03-09T04:11:46+5:302021-03-09T04:11:46+5:30

हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात मराठी विभागाने आयोजित केलेल्या जागतिक महिला दिनानिमित्तच्या कार्यक्रमात 'उत्सव स्त्रीत्वाचा' या विषयावर त्या बोलत होत्या. जागतिक ...

Students should be self-reliant through education: Prof. Nita Dongre | विद्यार्थिनींनी शिक्षणातून आत्मनिर्भर व्हावे : प्रा. नीता डोंगरे

विद्यार्थिनींनी शिक्षणातून आत्मनिर्भर व्हावे : प्रा. नीता डोंगरे

हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात मराठी विभागाने आयोजित केलेल्या जागतिक महिला दिनानिमित्तच्या कार्यक्रमात 'उत्सव स्त्रीत्वाचा' या विषयावर त्या बोलत होत्या.

जागतिक महिला दिनानिमित्त मराठी विभागाने स्त्री-जाणिवांच्या कवितांचा काव्यजागर, महिला दिन हवा कशाला? या विषयावर परिसंवाद, उंच माझा झोका या विषयावर विद्यार्थिनी मनोगते तसेच महिला दिनानिमित्त शुभेच्छा संदेशाची स्पर्धा असे विविध उपक्रम आयोजित केले. या उपक्रमांत प्रतीक्षा खराडे, मंगल भदाणे, मयुरी साकोरे, नीता गुरव, अश्विनी लडके, ऋतुजा मांडेकर, स्वाती सावंत इ. विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेऊन आपले विचार मांडले.

अर्थशास्त्र विभागाच्या वतीने महिलांचे आर्थिक सशक्तीकरण या विषयावर उपक्रम राबविण्यात आले. जागतिक महिला दिन हा स्त्रीत्वाचा उत्सव असून महिलांच्या हक्कांचे रक्षण आणि स्त्रीसन्मानतेच्या दृष्टीने या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. या निमित्ताने विद्यार्थिनींनी शिक्षणातून स्वतःची क्षमता ओळखणे, त्या क्षमतांना न्याय देणे आणि भौतिक गोष्टीत अडकून न पडता वैचारिक प्रगल्भता जोपासणे गरजेचे आहे. आरोग्य, शिक्षण, संस्कार व स्वावलंबन या चतु:सूत्रीच्या माध्यमातून विद्यार्थिनींनी स्वतःला स्वयंपूर्ण करावे, असे प्रा. नीता डोंगरे यांनी या वेळी सांगितले. या वेळी प्राचार्य डॉ.व्ही.डी.कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. संजय शिंदे, डॉ. बाळासाहेब अनुसे उपस्थित होते.

०८ राजगुरुनगर

Web Title: Students should be self-reliant through education: Prof. Nita Dongre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.