शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अाराेग्य अाणि करिअरसाठी धावणार एमपीएससीचे विद्यार्थी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2018 18:07 IST

विद्यार्थ्यांनी स्वत:च्या आरोग्यासाठी आणि करिअरसाठी धावण्याचा निर्णय घेतला आहे.येत्या 9 डिसेंबर रोजी ‘करिअर थॉन’च्या निमित्ताने हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरणार आहेत.

पुणे : राज्य शासनाने महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)वतीने विविध विभागातील रिक्त असलेल्या सुमारे 3 लाख जागांची भरती तात्काळ करावी,यासाठी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांनी निदर्षने केली,हजारोंच्या संख्येने मोर्चे काढले, सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलने केली. मात्र,तरीही शासनाला जाग येत नसल्याने विद्यार्थ्यांनी स्वत:च्या आरोग्यासाठी आणि करिअरसाठी धावण्याचा निर्णय घेतला आहे.येत्या 9 डिसेंबर रोजी ‘करिअर थॉन’च्या निमित्ताने हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरणार आहेत.  

    दिवसेंदिवस राज्यातील शासकीय कार्यालयांमधील रिक्त जागांची संख्या वाढत चालली असून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांची संख्याही वाढत आहे.त्यातून जीवघेणी स्पर्धा निर्माण झाली आहे. अर्थिक परिस्थिती आणि निकृष्ट दर्जाचे अन्न पदार्थ यामुळे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहेत. विद्यार्थी तासंतास अभ्यास करतात. मात्र, शासनाकडून रिक्त जागा भरल्या जात नसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तणावाचे आणि नैराश्याचे वातावरण आहे. गेल्या काही महिन्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणा-या 6 ते 7 विद्यार्थ्यांचा आतड्याचा आजार झाल्याने आणि ह्रृदयविकाराने मृत्यू झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासावरच लक्ष देवू नये तर स्वत:च्या आरोग्याकडेही लक्ष द्यावे,या उद्देशाने ‘शिवनेरी फाऊंडेशन’ व ‘एमपीएससी स्टूडेस् राईट्स’च्या वतीने सकाळी 6.30 वाजता टिळक चौक ते शनिवारवाडा दरम्यान ‘करिअर थॉन’रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.      शिवनेरी फाऊंडेशनचे संदीप मोहिते म्हणाले,स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे बहुतांश विद्यार्थी दुष्काळी भागातील असून त्यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच आहे.अभ्यासाच्या ताणामुळे आणि निकृष्ण अन्न पदार्थामुळे विद्यार्थ्यांना आयोग्याचा समस्या निर्माण झाल्या आहेत.त्यामुळे विद्यार्थ्यांनी स्पर्धेच्या युगात धावताना अभ्यासाबरोबरच अरोग्याचीही काळजी घ्यावी,या उद्देशाने करिअर थॉनचे आयोजन केले आहे. महेश बढे म्हणाले,शासकीय कार्यालयातील रिक्त जागांमुळे विद्यार्थ्यांनाच त्रास होत नाही.तर कार्यालयात मनुष्यबळ उपलब्ध नसल्यामुळे वेळेत काम होत नाही.परिणामी नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.तसेच कर्मचारी व अधिका-यांवरही कामाचा ताण वाढतो.त्यामुळे पुणेकर नागरिकांनी व शसकीय कर्मचा-यांनी सुध्दा ‘करिअर थॉन’मध्ये सहभागी व्हावी,असे आवाहन स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आले आहे. 

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाStudentविद्यार्थीHealthआरोग्य