विद्यार्थ्यांनी केले कळसूबाई शिखर सर
By Admin | Updated: January 6, 2015 00:24 IST2015-01-06T00:24:42+5:302015-01-06T00:24:42+5:30
विविध किल्ल्याची सफर करणाऱ्या आणि प्रवासाची आवड असणाऱ्या राज्यातील नऊ विद्यापीठांमधील शंभरहून अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आज कळसूबाई शिखर सर करून टे्रकिंगचा आनंद घेतला.

विद्यार्थ्यांनी केले कळसूबाई शिखर सर
पुणे: विविध किल्ल्याची सफर करणाऱ्या आणि प्रवासाची आवड असणाऱ्या राज्यातील नऊ विद्यापीठांमधील शंभरहून अधिक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आज कळसूबाई शिखर सर करून टे्रकिंगचा आनंद घेतला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह राज्यातील नऊ विद्यापीठांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय गिर्यारोहण शिबिरात शंभरहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.
विद्यापीठाशी संलग्न असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथील महाविद्यालयात विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. विजय खरे, विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक यांच्या उपस्थितीत रविवारी या शिबिराचे उद्घाटन झाले होते.
शिबिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ अशा नऊ विद्यापीठांमधील शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी सोमवारी सकाळी साडेसहा वाजता कळसूबाई शिखर चढण्यास सुरुवात केली
होती.
त्यातील दहा विद्यार्थी अवघ्या एक ते दीड तासात शिखरावर जाऊन पोहोचले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील नाना शिंदे, वीणा राठोड, अमोल मोरे, प्रियंका पोळ, प्रियंका रणदिवे, नवनाथ लवाटे, ॠषीकेश येवले, स्नेहल पाटील या विद्यार्थ्यांनी हे शिखर सर केले. (प्रतिनिधी)
कळसूबाई शिखर सर करणे हा आमच्यासाठी खूप मोठा आनंद आहे. या कॅम्पमधील २९ मुलींनी हे शिखर सर केले, ही अभिमानाची गोष्ट आहे. ट्रेकिंग करताना आम्हाला दुर्मिळ वनस्पतीदेखील पाहायला मिळाल्या.
- वीणा राठोड
पुणे परिसरातील सर्व किल्ल्यांवर मी गिर्यारोहण केले होते. परंतु, राज्यातील सर्वाधिक उंचीवरील कळसूबाई शिखर राहिले होते. ती हुरहूर मनात होती. माझे हे ध्येय पूर्ण झाल्याचा आनंद होत आहे.
- गीता भास्कर