शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

इंजिनिअरिंगचे विद्यार्थी दुचाकीचोर, विमानतळ पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 02:53 IST

मौजमजेसाठी दुचाकी वाहनांची शिताफीने चोरी करणाऱ्या इंजिनिअरिंगच्या ६ विद्यार्थ्यांना विमानतळ पोलिसांनी नुकतीच अटक केली. शहर व इतर ठिकाणी केलेल्या विविध ७ वाहनचोरीच्या गुन्ह्यांतील १८ दुचाकी विमानतळ पोलिसांनी त्यांच्याकडून हस्तगत केल्या आहेत.

विमाननगर - मौजमजेसाठी दुचाकी वाहनांची शिताफीने चोरी करणाऱ्या इंजिनिअरिंगच्या ६ विद्यार्थ्यांना विमानतळ पोलिसांनी नुकतीचअटक केली. शहर व इतर ठिकाणी केलेल्या विविध ७ वाहनचोरीच्या गुन्ह्यांतील १८ दुचाकी विमानतळ पोलिसांनी त्यांच्याकडून हस्तगत केल्या आहेत.या प्रकरणी सोहेल शेख (वय २०, रा. लोहगाव), आदेश ऊर्फ विनायक रामचंद्र शिंदे (वय १९, रा. परभणी), आशिष सुनील सरदार (वय २० रा. मलकापूर, जि. बुलडाणा), माधव कृष्ण गोपाल प्रसाद सिंह (वय १९, रा. वेळूसराय, बिहार), किरण खैरनार (वय २०, रा. नाशिक) व सोमनाथ प्रकाश पाटोळे (वय २३, रा. आळंदी) यांना अटक केली. सोबत्यांकडून शहर व ग्रामीण परिसरातून चोरलेल्या विविध १८ दुचाकी, असा सुमारे २१ लाख ८५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांनी सांगितले, की दुचाकी वाहनचोरीचे गुन्हे रोखण्यासाठी विमानतळ पोलिसांना दिलेल्या आदेशानुसार लोहगाव परिसरात गस्त करीत असताना पोलीस नाईक सारंग दळे व दीपक सानप यांना सोहेल शेख हा एका दुचाकीवर संशयास्पदरीत्या मिळून आला. त्यांच्याजवळ असणाºया केटीएम या दुचाकीबाबत विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. अधिक तपासात ही दुचाकी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. त्याने इतर साथीदारांच्या मदतीने शहरात वाहनचोरीचे अनेक गुन्हे केल्याचे तपासात उघड झाले. सोहेल व त्याचे इतर साथीदार शहरातील एका नामवंत महाविद्यालयात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहेत.पोलीस उपायुक्त दीपक साकोरे सहायक पोलीस आयुक्त गणेशगावडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे, गुन्हे निरीक्षक रमेश साठे, सहायक पोलीस निरीक्षक एम. आर. खोकले, उपनिरीक्षक आनंदराव पिंगळे, उपनिरीक्षक दीपक जाधव, पोलीस कर्मचारी संभाजी तांबे, मोहन काळे, विजय सावंत, संजय आडारी, सचिन भिंगारदिवे, राहुल मोरे, विशाल गाडे, विनोद महाजन, किरण पड्याळ, प्रशांत कपूर, प्रदीप राऊत, दीपक सानप, वसीम सय्यद, अजय विधाते, स्वप्निल जाधव, विकास शिंदे, पुष्पेंद्र चव्हाण यांच्या पथकाने या वाहनचोरांच्या टोळीचा गुन्हा शिताफीने उघडकीस आणला. वाहनचोरीच्या या गुन्ह्याचा पुढील तपास विमानतळ पोलीस करीत आहेत.वाहनचोरीचे एकूण १७ गुन्हे उघडकीसविमानतळ पोलिसांनी केलेल्या तपासात हे सर्व विद्यार्थी इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमांचे शिक्षण घेतात. मौजमजेसाठी यांनी या दुचाकी चोरल्या असून बनावट किल्लीने तसेच हँडललॉक तोडून ते या दुचाकी चोरत असत. त्यांच्याकडून विमानतळ, डेक्कन, विश्रांतवाडी, चंदननगर, दत्तवाडी, वानवडी, विश्रामबाग, खडक, स्वारगेट, कोथरूड यासह आळंदी पोलीस ठाण्यात वाहनचोरीचे एकूण १७ गुन्हे उघडकीस आले आहेत.मौजमजेसाठी ते चोरी करायचेमौजमजेसाठी शहर व ग्रामीण पोलीस हद्दीतून अनेक दुचाकी चोरल्याचे निष्पन्न झाले. या गुह्यातील आरोपींना विमानतळ पोलिसांनी शिताफीने वेगळ्या परिसरातून अटक केली. त्यांच्याकडून एकूण १७ गुन्ह्यांमधील १८ दुचाकी, असा २१ लाख ८५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. यामध्ये ४ बुलेट, ४ केटीएम, ३ पल्सर, प्रत्येकी १ करिज्मा, युनिकॉर्न, अ‍ॅक्टिव्हा, ज्युपिटर, सीडी डिलक्स व डॉमिनर अशा एकूण १८ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाnewsबातम्या