शाळा पाडल्याने विद्यार्थी रस्त्यावर

By Admin | Updated: June 23, 2014 22:33 IST2014-06-23T22:33:37+5:302014-06-23T22:33:37+5:30

वडगावशेरी येथील विद्या विकास मंडळ या संस्थेची सुमारे 4क् वर्षापासून सुरू असलेल्या नॅशनल चिल्डर्न्‍स अॅकॅडमी या शाळेची इमारत जमीनदोस्त करण्यात आली आहे.

Students are protesting on the streets, leaving the school | शाळा पाडल्याने विद्यार्थी रस्त्यावर

शाळा पाडल्याने विद्यार्थी रस्त्यावर

>पुणो : वडगावशेरी येथील विद्या विकास मंडळ या संस्थेची सुमारे 4क् वर्षापासून सुरू असलेल्या नॅशनल चिल्डर्न्‍स अॅकॅडमी या शाळेची इमारत जमीनदोस्त करण्यात आली आहे. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थी रस्त्यावर आले आहेत.  आमच्या मुलांनी जायचे कुठे? असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे.
या शाळेची इमारत शेखर गलांडे यांच्या जागेवर उभी करण्यात आली होती. या पूर्वीही ही इमारत पाडण्याचा प्रकार झाला होता. परंतु, त्या विरोधात न्यायालयात घाव घेतल्यामुळे इमारत पाडण्याचे काम थांबले होते. परंतु, शाळा व्यवस्थापनाने गलांडे यांच्याशी समजुतीचा करार केला. गलांडे हे या जागेवर शाळेसाठी 1क् खोल्या  देतील, असे या करारात नमूद करण्यात आले होते. याच्याच आधारावर गलांडे यांनी ही इमारत जमीनदोस्त केली, असे  संस्थेचे अध्यक्ष ए.जे. रणनवरे यांनी केला आहे. दरम्यान, 16 जूनपासून शाळा सुरू झाल्या, तरीही शाळा व्यवस्थापनाने विद्याथ्र्याची बैठक व्यवस्था केली नाही. परिणामी पालकांनी आज शाळेच्या आवारात गोंधळ घालत शाळा व्यवस्थापनाला जाब विचारला.
विद्या विकास मंडळातर्फे 1972 मध्ये सुरू करण्यात आलेली ही शाळा 17 मे 2क्14 रोजी जमीनदोस्त करण्यात आली. दरम्यानच्या काळात शाळा प्रशासनाला विद्याथ्र्याची बैठक व्यवस्था करण्यासाठी वेळ होता. परंतु, 17 मे ते 23 जून या कालावधीत शाळा व्यवस्थापनाने कोणत्याही हालचाली केल्या नाहीत. पूर्व प्राथमिकपासून इयत्ता दहावीर्पयतच्या तब्बल 4क्क् विद्याथ्र्याच्या प्रश्न उभा राहिल्याने विद्याथ्र्यानी आता जायचे कुठे, असा सवाल  पालक उपस्थित करत आहेत. 
शाळा प्रशासनाने व जागा मालकाने पालकांना अंधारात ठेवून शाळेची इमारत पाडली, असा आरोप काही पालकांनी केला आहे. पर्यायी जागेची सोय करण्याची मागणी आता होत आहे. (प्रतिनिधी)
 
न्यायालयाने शाळेची इमारत पाडू नये असे आदेश दिले असले; तरी शाळा व्यवस्थापनाच्या संमतीने मी ही इमारत पाडली आहे. शाळा प्रशासन विद्याथ्र्याची बसण्याची व्यवस्था करणार होते. परंतु, त्यांनी ती न केल्यामुळे पालकांनी सोमवारी शाळेत येऊन गोंधळ घातला.
 - शेखर गलांडे, 
जागामालक 
 
जागामालकाने शाळेची इमारत पाडावी, असा करार शाळा प्रशासनाने केलेला नाही. जागा मालकाने पालिका प्रशासनाची परवानगी न घेता,तसेच न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करता इमारत पाडली आहे. परंतु, येत्या चार दिवसांत आम्ही विद्याथ्र्याची बैठक व्यवस्था करणार आहोत. 
- ए. जे. रणनवरे 
अध्यक्ष, विद्या विकास मंडळ
 
 

Web Title: Students are protesting on the streets, leaving the school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.