शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी नोकरभरतीमधील भ्रष्टाचाराविरूध्द विद्यार्थ्यांचा एल्गार, पुणे ते मुंबई पदयात्रा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2018 22:36 IST

पुण्यातील डेक्कन नदीपात्रातून १९ मे रोजी या लाँगमार्चला सुरूवात होणार आहे.

ठळक मुद्दे१९ मे ते २४ मे च्या दरम्यान आयोजनरात्रीचा प्रवास करीत मुंबईमध्ये धडकणार

पुणे : सरकारी नोकर भरती भ्रष्टाचार विरोधी संघर्ष समितीच्या वतीने दि. १९ ते २४ मे या कालावधीत पुणे ते मुंबई अशी पदयात्रा (लाँगमार्च) काढण्यात येणार आहे. पुण्यातील डेक्कन नदीपात्रातून १९ मे रोजी या लाँगमार्चला सुरूवात होणार आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसह विविध क्षेत्रातील कार्यकर्ते यामध्ये सहभागी होणार आहेत.  राज्य सेवेतील व जिल्हा पातळीवरील नोकरी भरती घोटाळयांची न्यायालयीन चौकशी, मागील सात वर्षात झालेल्या बोगस नियुक्त्यांची चौकशी, खोटे खेळाडू, जात, अपंग व टाईपिंग प्रमाणपत्र देवून शासकिय सेवेत आलेल्यांचे निलंबन, गट अ ते गट ड वर्गातील सर्व परीक्षा राज्या सेवा आयोगामार्फत घेण्यात याव्यात, राज्य शासनामधील १ लाख ७७ हजार रिक्त जागा तसेच पोलिसांच्या ५० हजार रिक्त जागा तत्काळ भरण्यात याव्यात, खाजगी कंपनीला नोकर भरतीची कामे कंत्राटी पध्दतीने देवू नये. महापोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या सर्व परीक्षा आॅफलाईन पध्दतीने, यूपीएससी, एमपीएससीची स्वतंत्र इमारत व राज्यभरात चार प्रादेशिक मुख्यालय आदी मागण्या संघर्ष समितीच्या वतीने शासनापुढे ठेवण्यात येणार आहेत. या आंदोलनामध्ये विद्यार्थी तसेच विविध चळवळीमधील कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने सहभागी होण्याचे आवाहन योगेश जाधव,अभय टकसाळ, गिरीष फोंडे, अमोल हिपरगे, सागर दुर्योधन, पंकज चव्हाण, प्रदिप घागरे, संतोश खोडदे, साई डहाळे, महेश बडे यांनी केले आहे..............रात्रीचा प्रवास करीत मुंबईमध्ये धडकणारविद्यार्थ्यांचा लाँगमार्च पुण्यातील डेक्कन नदीपात्र चौपाटी पासून १९ मे रोजी सुरू होईल. त्यानंतर दररोज रात्रीचा प्रवास करीत तळेगांव दाभाडे, लोनावळा, कर्जत, कल्याण, ठाणे असा प्रवास करीत दिनांक २४ मे रोजी मुंबईतील आझाद मैदानात धडकणार आहे.

टॅग्स :PuneपुणेMumbaiमुंबईStudentविद्यार्थीState Governmentराज्य सरकार