शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी बनणार ‘माहिती दूत’; शासकीय योजना तळागाळात पोहोचविणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2018 02:44 IST

आपल्या विविध योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य सरकार आता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा वापर करणार आहे.

- राहुल गायकवाडपुणे : आपल्या विविध योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य सरकार आता महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा वापर करणार आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने ‘युवा माहिती दूत’ हा उपक्रम हाती घेतला असून, राज्यभरातील महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील १ लाख युवकांमार्फत दोन कोटी जनतेपर्यंत पोचण्याची तयारी केली आहे.सरकारी योजनांची माहिती वृत्तपत्रे, दूरचित्रवाणी, रेडिओ यांच्यामार्फत पोहोचवली जाते, परंतु लाभ घेऊ शकतील असे अनेक जण अर्धशिक्षित, दारिद्र्यरेषेखालील आणि दुर्गम भागातील असल्याने त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचतेच असे नाही. राज्यात ६ हजारांपेक्षा जास्त महाविद्यालये २३ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी तेथे शिकतात. त्यापैकी किमान १ लाख युवक या उपक्रमात सहभागी होतील, अशी सरकारची अपेक्षा आहे. त्यासाठी प्रत्येक महाविद्यालयातील सहभागी विद्यार्थ्यांमागे एक मार्गदर्शक नेमण्यात येणार आहे. अध्यापक, ग्रंथपाल, अधीक्षक, क्रीडा शिक्षक यापैकी एकाची युवा माहिती दूत मार्गदर्शक म्हणून निवड करण्यात येईल. राज्य सरकारने या योजनेच्या अंमलबजावणीसाठी विशेष मोबाइल अ‍ॅप तयार केले आहे.पत्र पाठविले...शिक्षण सहसंचालकांकडून सर्व विद्यापीठ, तसेच कॉलेजांना याबाबतचे पत्र पाठविण्यात आले आहे. युनिसेफ आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या प्रत्यक्ष सहयोगाने हा उपक्रम हाती घेतल्याचे त्यात म्हटले आहे.

टॅग्स :collegeमहाविद्यालयStudentविद्यार्थी