अकरावीत प्रवेश नाकारल्यामुळे विद्यार्थ्याची आत्महत्या
By Admin | Updated: July 11, 2015 05:24 IST2015-07-11T05:24:26+5:302015-07-11T05:24:26+5:30
अकरावीच्या कला शाखेत प्रवेश नाकारल्याने नगर जिल्ह्यात विद्यार्थ्याने आत्महत्या केली असल्याची तक्रार शुक्रवारी शिक्षण आयुक्तांकडे करण्यात आली

अकरावीत प्रवेश नाकारल्यामुळे विद्यार्थ्याची आत्महत्या
पुणे : अकरावीच्या कला शाखेत प्रवेश नाकारल्याने नगर जिल्ह्यात विद्यार्थ्याने आत्महत्या केली असल्याची तक्रार शुक्रवारी शिक्षण आयुक्तांकडे करण्यात आली. याप्रकरणी आयुक्तांनी संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना तातडीने चौकशी करण्याचा आदेश दिला आहे.
नेवासा तालुक्यातील लहू रामभाऊ जरे या विद्यार्थ्याने ७ जुलैला सकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याचा भाऊ अंकुश जरे यांनी याप्रकरणी सोनई पोलीस ठाण्याला तक्रार दिली. घोडेगाव येथे लहू याला अकरावीच्या कला शाखेत प्रवेश हवा होता. परंतु प्राचार्यांनी प्रवेश न दिल्याने त्याने हे पाऊल उचलल्याचे जरे कुटुंबीयांचे म्हणणे आहे, अशी तक्रार नगरचे जिल्हा परिषद सदस्य व मराठा महासंघाचे राज्य संपर्क प्रमुख संभाजी दहातोंडे यांनी शिक्षण उपसंचालक कार्यालय तसेच शिक्षण आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्याकडे केली. भापकर यांनी तातडीने नगरच्या शिक्षणाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. अकरावी प्रवेश प्रक्रिया नियमानुसार सुरू आहे का, हीदेखील तपासणी करण्यास सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)