विद्यार्थ्यांच्या गाडीला अपघात; चार जखमी

By Admin | Updated: February 29, 2016 01:08 IST2016-02-29T01:08:20+5:302016-02-29T01:08:20+5:30

येथील धोकादायक वळणावर रविवारी सकाळी सादेदहा वाजता झालेल्या दोन जीपच्या अपघातात चारजण किरकोळ जखमी झाले.

Student car accident; Four injured | विद्यार्थ्यांच्या गाडीला अपघात; चार जखमी

विद्यार्थ्यांच्या गाडीला अपघात; चार जखमी

वाडा: खरोशी (ता.खेड) येथील धोकादायक वळणावर रविवारी सकाळी सादेदहा वाजता झालेल्या दोन जीपच्या अपघातात चारजण किरकोळ जखमी झाले.
डेहणे बाजूकडून राजगुरुनगरकडे जीप (एमएच १४ अए ७९१२) प्राथमिक शाळेतील विद्यार्थी भजन स्पर्धेसाठी घेवून जात होती. खरोशी आणि डेहणे गावांमध्ये धोकेदायक वळणावर समोरून आलेल्या बोलोरोने जोरदार ठोकर दिली. या अपघातात विद्यार्र्थ्याची जीप रस्त्याच्या पलीकडे पलटी झाली. यात नायफड गावातील प्राथमिक शाळेच्या दोन विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापती झाल्या तर चालक आणि एका प्रवाशाला मुका मार लागला आहे. त्यातील दोन मुलांवर वाडा येथे किरकोळ उपचार करण्यात आले त्यानंतर घरी सोडण्यात आले.

Web Title: Student car accident; Four injured