पत्नीचा मानसिक छळ पतीला अटक
By Admin | Updated: June 9, 2014 23:35 IST2014-06-09T23:05:24+5:302014-06-09T23:35:52+5:30
माहेराहून पैसे आणण्यासाठी पत्नीचा शाररिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी अटक केली आहे

पत्नीचा मानसिक छळ पतीला अटक
पुणे : माहेराहून पैसे आणण्यासाठी पत्नीचा शाररिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी अटक केली आहे तसेच दीर व दीराचा मित्राने विनयभंग केल्या प्रकरणी पोलिस त्यांचा तपास करत आहेत.
न्यायालयाने पतीला ११ जूनपर्यत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
जितेंद्र शंकरलाल सिंह (वय २६, रा. नागपुरचाळ, येरवडा) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पत्नीने फिर्याद दिली आहे. या प्रकरणी दीर देवेंद्र शंकरलाल सिंह व अखंडकुमार शुक्ला यांचा पोलिस शोध घेत आहेत. जितेंद्र सिंह याने फिर्यादीशी प्रेम विवाह केला होता त्यानंतर ते भोपाळ येथे गेले. तेथे गेल्यानंतर दीराच्या सांगण्यावरून तो तिला माहेराहून सोन्याचे दागिने, पैसे, मोटारसायकल घेण्यासाठी पैसे आण म्हणून छळत असे. तसेच दीर फिर्यादी बेडमध्ये असताना आत येण्याचा प्रयत्न करीत असे.
८ मे रोजी जितेंद्र फिर्यादीचे २६ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने घेऊन गेला. त्यावेळी अखंडकुमार शुक्ला ाने फोन करून तू वेश्या आहेस, माझ्याशी शरिरसंबंध ठेवल्यास तुला २ हजार रूपये देतो असे सांगून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच दीरानेही विनयभंग केला.
आरोपीला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्याने फिर्यादी हिच्याबरोबर प्रेमविवाह करून तिच्याबरोबर संसार न करता परराज्यात घेऊन गेला यामागे नक्की काय उद्देश आहे. तसेच अखंडकुमार अश्लिल बोलत असताना जितेंद्र तिथे होता तरीही त्याने त्याबाबत आक्षेप का घेतला नाही याबाबत तपास करण्यासाठी व देवेंद्रचा शोध घेण्यासाठी पोलिस कोठडी देण्यात यावी असा युक्तिवाद सरकारी वकिल वामन कोळी यांनी केले. न्यायलयाने तो ग्रा धरला.