एसटीच्या ‘रातराणी’ रिकाम्या; ट्रॅव्हल्स मात्र भरलेल्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:08 IST2021-06-17T04:08:13+5:302021-06-17T04:08:13+5:30

पुणे विभागाची रातराणी बंद : अन्य विभागाच्या गाड्या रिकाम्या लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : अनलॉकनंतर सुरू झालेली एसटी ...

ST’s ‘Nightmare’ empty; Travels are full! | एसटीच्या ‘रातराणी’ रिकाम्या; ट्रॅव्हल्स मात्र भरलेल्या !

एसटीच्या ‘रातराणी’ रिकाम्या; ट्रॅव्हल्स मात्र भरलेल्या !

पुणे विभागाची रातराणी बंद : अन्य विभागाच्या गाड्या रिकाम्या

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : अनलॉकनंतर सुरू झालेली एसटी सेवा आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. लालपरीला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. मात्र, रातराणी ही रिकामीच धावत आहे. ही परिस्थिती पाहून एसटीच्या पुणे विभागाने रातराणी बंदच ठेवली आहे. तर अन्य विभागाच्या गाड्या प्रवाशांविना धावत आहेत. दुसरीकडे ट्रॅव्हल्सला मात्र चांगला प्रतिसाद लाभत आहे. विशेष म्हणजे, रातराणीच्या तुलनेने ट्रॅव्हल्सचे दर जास्त आहे. तरीही प्रवासी ट्रॅव्हल्सने प्रवास करणे पसंत करीत आहे.

संध्याकाळी सात ते पहाटे पाच यादरम्यान रातराणी धावते. याचे दर लालपरीच्या तुलनेने जास्त आहे. तरीदेखील याला प्रवाशांचा प्रतिसाद पूर्वी चांगला मिळत होता. विशेषतः मुंबई, सोलापूर व कोल्हापूर मार्गावर आता मात्र रातराणीची अवस्था बिकट आहे. ज्या काही रातराणी धावत आहे त्याला अत्यल्प प्रतिसाद लाभत आहे.

बॉक्स १

जिल्ह्यात एसटी फेऱ्या किती :

पुणे विभागाच्या जिल्ह्यात सामान्यपणे ४४० एसटी गाड्या धावत आहेत. याच्या जवळपास १४१६ फेऱ्या होतात. यातून सुमारे ५१ हजार प्रवासी प्रवास करीत आहे. पुणे विभागाच्या जवळपास १ हजार गाड्या आहेत. यात अन्य विभागाच्या एक ते दोन गाड्या आहेत.

बॉक्स २ :

कोणत्या मार्गावर प्रतिसाद चांगला :

ज्या काही मोजक्या रातराणी धावत आहेत, त्यांना पुणे-मुंबई, पुणे-सोलापूर व पुणे-कोल्हापूर आदी मार्गांवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा मार्ग रातराणीसह सर्वच प्रकारच्या बससाठी चांगला आहे. उदा. शिवशाही, लालपरी .

बॉक्स ३

कोणत्या मार्गावर कमी प्रतिसाद :

पुणे विभागाने स्वतःची रातराणी बंद ठेवली आहे. मात्र, ज्या अन्य विभागाच्या गाड्या पुण्यात येऊन पुढे जातात. अशा मध्ये लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद आदी शहरांना जाणाऱ्या रातराणी रिकाम्या जात आहे. सर्वांत कमी प्रतिसाद याच मार्गावर मिळत आहे.

बॉक्स ४

ट्रॅव्हल्सला कोणत्या मार्गावर जास्त प्रतिसाद :

पुण्याहून रात्रीच्या वेळी सुटणाऱ्या बहुतांश ट्रॅव्हल्सला सर्वच मार्गांवर चांगला प्रतिसाद लाभत आहे. यात पुणे-कोल्हापूर, पुणे-सातारा ,पुणे-नाशिक, पुणे-मुंबई, पुणे-पणजी, पुणे-सोलापूर आदी मार्गांवर चांगला प्रतिसाद आहे.

कोट

एसटी सेवेला प्रवाशाचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. मात्र, रातराणीला अपेक्षित असा प्रतिसाद नाही. त्यामुळे पुणे विभागाची रातराणी गाडी बंद आहे.

- ज्ञानेश्वर रणवरे, विभागीय वाहतूक अधिकारी, पुणे एसटी विभाग.

Web Title: ST’s ‘Nightmare’ empty; Travels are full!