रंग खेळण्यास नकार दिल्याने मारहाण
By Admin | Updated: March 21, 2017 05:42 IST2017-03-21T05:42:43+5:302017-03-21T05:42:43+5:30
रंगाची अॅलर्जी असल्याचे सांगत रंग खेळण्यास नकार देणा-याला एकाने बेशुद्ध होईपर्यंत बेदम मारहाण केली.

रंग खेळण्यास नकार दिल्याने मारहाण
पुणे : रंगाची अॅलर्जी असल्याचे सांगत रंग खेळण्यास नकार देणा-याला एकाने बेशुद्ध होईपर्यंत बेदम मारहाण केली. ही घटना 13 मार्च रोजी फुरसुंगी येथील मालधक्का पॉवर हाऊसजवळ घडली. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
हनुमंत अर्जून पिसाळ (वय 47, रा. फुरसुंगी, हडपसर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दादा शिंदे (वय 43, रा. फुरसुंगी) यांनी फिर्याद दिली
आहे. शिंदे मालधक्का पॉवर
हाऊस येथे काम करीत होते. त्यावेळी पिसाळ त्यांना रंग लावण्यासाठी गेला. त्यांनी रंगाची अॅलर्जी असल्याचे सांगत रंग न लावण्याबाबत विनंती केली. तरीही पिसाळ यांनी त्यांना रंग लावण्याचा प्रयत्न केला. शिंदे यांनी त्यांचा हात झटकला. हा हात पिसाळच्या पोटाला लागला. त्यावरुन मारामारी झाली़