शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

‘ती’च्या आवाजाकरिता संघर्ष सुरूच राहील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2018 02:03 IST

बाते अमनकी यात्रेद्वारे जनजागृती : चूल व मूलच्या चौकटीतच आयुष्य

पुणे : जागतिकीकरणाच्या युगात कितीही पुढारलेल्या गप्पा मारल्या तरी पुरुषी मानसिकता विविध क्षेत्रात डोकावतेच. उच्च शिक्षण घेऊनदेखील परंपरागत बेड्यांमध्ये अडकून पडण्याची इच्छा त्या मानसिकतेत दिसून येते. यामुळे देश प्रगतीपथावर असला तरी त्याचा सामाजिक विकास खुंटला जातो. सध्या भारतात स्वतंत्रपणे आपली भूमिका मांडण्यासारखी परिस्थिती नसून ती बदलण्याकरिता तसेच चौकटीत अडकून पडलेल्या महिलांच्या आवाजाकरिता संघर्ष सुरूच ठेवणार असल्याचे ‘‘बाते अमन की’’ या उपक्रमातील सहभागी महिला पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

२० सप्टेंबर ते १३ आॅक्टोबर दरम्यान देशातील २२ घटकराज्यांमध्ये बाते अमन की उपक्रमाचे निमित्त साधून संवादयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. केरळहून निघालेली ही यात्रा कर्नाटकमार्गे कोल्हापूरला येऊन सोमवारी पुण्यात दाखल झाली. यावेळी संवादयात्रेची माहिती देण्याकरिता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला शबनम हाश्मी, लता भिसे-सोनवणे उपस्थित होत्या. राजकीय दबाव व त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्याची होणारी गळचेपी याविषयी बोलताना हाश्मी म्हणाल्या, बाते अमनकीच्यानिमित्ताने विविध राज्यांमध्ये प्रवास होत असून त्यानिमित्ताने तेथील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक परिस्थितीचा अभ्यास करता येतो. मोदींच्या गुजरातमध्ये पत्रकार परिषद घेतानादेखील खूप तांत्रिकदृष्ट्या औपचारिकतेला सामोरे जावे लागले. सरकारी माध्यमांवर दबाव, कुणी काय खावे, काय बोलावे इतकेच नव्हे, तर कुणी कुठल्या प्रकारचे कपडे घालावेत यावरदेखील बंधने येत असल्याने गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. महिलांच्या समस्यांवर प्रभावी उत्तरे शोधण्याची गरज आहे. त्यांना अद्याप कुटुंबाच्या पारंपरिक चौकटीत बंदिस्त करण्याची पद्धत आजही तितक्याच पुरुषी मानसिकतेने सुरू ठेवली गेली आहे. यावर सखोल विचारमंथन होण्याची गरज आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात रविवारी झालेल्या संवादात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. यावेळी विद्यार्थ्यांनी महिलांपेक्षा पुरुषांनाच समानतेचे धडे देण्याची जास्त गरज असल्याचे सांगितले.संवादयात्रा मुंबईकडे मार्गस्थ होणारबाते अमन की या संवादयात्रेच्या चमूने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची ज्या ठिकाणी हत्या झाली तिथे जाऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच समाजात ज्ञानाची ज्योत पेटविणारे व समतेचा संदेश देणाºया महात्मा जोतिबा फुले यांच्या वाड्यास भेट दिली. उद्या ही संवादयात्रा मुंबईकडे मार्गस्थ होणार आहे.

टॅग्स :PuneपुणेWomenमहिला