पाण्याचा गैरवापर रोखण्यासाठी कडक र्निबध
By Admin | Updated: July 11, 2014 23:55 IST2014-07-11T23:55:04+5:302014-07-11T23:55:04+5:30
पाण्याचा होणारा बेसुमार उपसा रोखण्यासाठी प्रशासनाकडून काही कठोर आणि प्रतिबंधात्मक निर्णय घेण्यात आले आहेत.

पाण्याचा गैरवापर रोखण्यासाठी कडक र्निबध
पुणो : पुण्यात पाणीकपातीचा निर्णय घेतानाच पालिकेकडून पुरविण्यात येणा:या पाण्याचा गैरवापर तसेच भूगर्भातील पाण्याचा होणारा बेसुमार उपसा रोखण्यासाठी प्रशासनाकडून काही कठोर आणि प्रतिबंधात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. शहराला दोन वेळ पाणीपुरवठा करण्यासाठी दररोज 125क् एमएलडी पाण्याची गरज भासते.
पालिकेने 12 टक्के पाणीकपात लागू केल्यानंतर हे प्रमाण 925 एमएलडीर्पयत कमी करण्यात आले, तर दिवसाआड पाण्यासाठी हे प्रमाण दररोज 8क्क् एमएलडी असणार आहे. तसेच दिवसाआड पाण्यासाठी विभागनिहाय वेळापत्रक तयार करण्यात येणार आहे.
या शिवाय शहरातील पिण्यायोग्य पाणी असलेल्या विहिरी आणि बोअरवेल्सच्या अधिग्रहणासाठी पुढील आठवडय़ात महापालिकेकडून जिल्हा प्रशासनास पत्र पाठविण्यात येणार आहे. जलसंवधर्नासाठी पालिकेने कठोर पावले उचलली आहेत. (प्रतिनिधी)
बांधकामांना बंदी
शहरातील सर्व प्रकारची बांधकामे येत्या सोमवारपासून बंद करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. बांधकामांना वापरणारे पाणी पिण्याचे आहे की बोअरवेल्सचे, हे तत्काळ तपासणो पालिकेस शक्य नाही, त्यामुळे सर्व बांधकामे बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच बांधकामांसाठी बोअरवेल्सचे पाणी वापरले जात असले तरी, बोअरवेल्समुळे भूगर्भातील पाणी पातळी खालावण्याची शक्यता आहे. त्याबाबतचा आदेश तत्काळ काढण्यात येणार आहे. तसेच पुढील आठवडय़ात धरणातील पाण्याचा आढावा घेतल्यानंतर बांधकाम बंदीबाबत निर्णय घेण्यात येईल.
शॉवर व टब बाथवर टाच
शहरातील मोठय़ा तारांकित हॉटेलमधील शॉवर तसेच टब बाथच्या वापरावरही पालिकेकडून बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत पालिकेची पथके या हॉटेलमध्ये जाऊन त्यांना आवाहन करणार आहेत. शहरात अशा प्रकारची अनेक हॉटेल असून तेथे पाणी वाया जात असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच त्याच्या अंमलबजावणीसाठीही उपाययोजना करण्यात येणार आहेत.
जलतरण तलावही होणार बंद
महापालिकेच्या तसेच खासगी मालकीचे व हॉटेलचे सुमारे 35क् जलतरण तलाव आहेत. या तलावांसाठी बोअरवेल्सचे पाणी वापरले जाते. मात्र, तलावात जाण्यापूर्वी आणि बाहेर आल्यानंतर पोहण्यासाठी आलेल्या नागरिकांना दोनदा शॉवर बाथ दिली जाते, त्यामुळे मोठय़ा प्रमाणात पाणी वाया जाते. ही बाब रोखण्यासाठी हे सर्वच तलाव बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
प्रत्येक प्रभागासाठी पाच टंँकर
खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठाही नियंत्रित करण्यात येणार आहे. त्यानुसार, प्रत्येक प्रभागाला पाच टँकर देणार असून यावर स्वतंत्र यंत्रणा लक्ष ठेवणार आहे. या शिवाय झोपडपट्टीत टँकरद्वारे पाणी देण्यात येणार असून त्या ठिकाणी मोठय़ा क्षमतेच्या टाक्या उभारण्यात येणार आहेत. या टँकरद्वारे पाणी वितरणासाठी पालिकेचे 15 व खासगी ठेकेदारांचे 7क् टँकर उपलब्ध करून दिले जातील.
खासगी जलस्नेत ताब्यात घेणार
पुणो : दिवसाआड पाणी दिल्यानंतरही धरणांमध्ये उपलब्ध असलेले पाणी पालिकेस 15 ऑगस्टर्पयत पुरणार आहे, त्यामुळे पुढील नियोजनासाठी शहरातील खासगी जलस्नेत अधिग्रहण करण्यासाठी पुढील आठवडय़ात जिल्हाधिका:यांना पत्र पाठविण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्त विकास देशमुख यांनी सांगितले. त्यासाठी शहरातील जलस्नेतांच्या सर्वेक्षणासाठी स्वतंत्र पथक नेमण्यात येणार असून त्यांच्या माध्यमातून जे पाणी पिण्यासाठी योग्य आहे असेच जलस्नेत अधिग्रहित करण्यात येणार असल्याचे देशमुख म्हणाले.
धरणातील पाण्यानंतर या जलस्नेतांवर पाणीपुरवठा अबलंबून असणार आहे. शहरात सुमारे 4,95क् खासगी बोअरवेल्स आहेत. तसेच पालिकेच्या 6क्क् बोअरवेल्स आहेत, तर 39क् सार्वजनिक विहिरी आहेत. त्यांच्या सद्य:स्थितीची माहिती पालिकेकडे उपलब्ध आहे. धरणातील पाणी संपल्यानंतर पालिकेस शहरास पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी या जलस्नेतांचा फायदा होणार आहे. मात्र, ते अधिग्रहित करण्याचा अधिकार जिल्हाधिका:यांना आहे, त्यामुळे धरणातील पाणीसाठय़ाची स्थिती आणखी गंभीर बनल्यास हे अधिग्रहित करण्यासाठी जिल्हाधिका:यांना पत्र पाठविण्यात येणार आहे. पिण्यासाठी योग्य नसलेल्या जलस्नेतांचे पाणी संबंधित मालकास वापरण्यास मुभा देण्यात येणार आहे. त्यावर बंधन घातले जाणार नसल्याचे देशमुख म्हणाले.
महापालिकेने शहरात सुमारे 6क्क् ठिकाणी बोअरवेल्स घेतल्या आहेत, त्यातील जवळपास 35क् बोअरवेल्सच सुरू आहेत तर 15क् नादुरुस्त आहेत. या नादुरुस्त बोअरवेल्स पुन्हा चालू करून त्याचे पाणी वापरासाठी यावे, यासाठी त्या दुरुस्त करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी स्वतंत्र पथकाची नेमणूकही करण्यात आली असून लवकरात लवकर दुरुस्त करण्यावर भर असल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.