एसटीच्या महिला वाहकास मारहाण
By Admin | Updated: April 29, 2017 03:57 IST2017-04-29T03:57:04+5:302017-04-29T03:57:04+5:30
सीटवरील बॅग कुठे ठेवली, याची विचारणा केली म्हणून एसटीच्या महिला वाहकास मारहाण करून अश्लील हावभाव केल्याप्रकरणी

एसटीच्या महिला वाहकास मारहाण
नारायणगाव : सीटवरील बॅग कुठे ठेवली, याची विचारणा केली म्हणून एसटीच्या महिला वाहकास मारहाण करून अश्लील हावभाव केल्याप्रकरणी जुन्नर येथील प्रवाशावर सरकारी कामात अडथळा व विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात
आला आहे, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर यांनी दिली.
अदिल जमील शेख (वय २७, रा. जुन्नर) या प्रवाशाविरुद्ध गुन्हा
दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात एसटी वाहक शोभा रमेश वाणी (वय २१, रा. जुन्नर) यांनी मारहाण व विनयभंगाची फिर्याद दिली आहे.
शोभा वाणी यांनी सीटवर बॅग ठेवली होती. शेख याने ती बॅग उचलून दुसरीकडे ठेवली. एसटीमध्ये आल्यावर ती बॅग कुठे ठेवली, अशी विचारणा केल्याने दोघांमधील वाद वाढला. शाब्दिक चकमका होऊन शेख याने वाणी यांना मारहाण केली व अश्लील हावभाव केले. याप्रकरणी भवारी अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)