शाखा अभियंत्याला लाच घेताना अटक

By Admin | Updated: February 2, 2016 01:15 IST2016-02-02T01:15:17+5:302016-02-02T01:15:17+5:30

खेड पंचायत समितीअंतर्गत जिल्हा परिषद बांधकाम उपविभागातील शाखा अभियंता अशोक पांडुरंग वानखेडे (वय ५१, रा. पुणे) यांना पर्यावरण संतुलित गावांतर्गत रस्त्याच्या मुरुमीकरणाच्या कामाचे

Strike of the branch engineer while taking bribe | शाखा अभियंत्याला लाच घेताना अटक

शाखा अभियंत्याला लाच घेताना अटक

राजगुरुनगर : खेड पंचायत समितीअंतर्गत जिल्हा परिषद बांधकाम उपविभागातील शाखा अभियंता अशोक पांडुरंग वानखेडे (वय ५१, रा. पुणे) यांना पर्यावरण संतुलित गावांतर्गत रस्त्याच्या मुरुमीकरणाच्या कामाचे मूल्यांकन करून देण्यासाठी वीस हजार रुपयांची लाच घेताना पुण्याच्या लाचलुचपत विभागाच्या पथकाने सोमवारी रंगेहाथ पकडले.
लाचलुचपत पथकाने दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील पिंपरी बुद्रुक (ठाकूर पिंपरी) येथे पर्यावरण संतुलित ग्राम योजनेंतर्गत मुरुमीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. या कामाचे सुमारे एक लाख सत्तर हजार रुपयांचे बिल ग्रामपंचायतीकरिता मंजूर करण्यासाठी त्याचे मूल्यांकन करून द्यावयाचे होते. हे मूल्यांकन करून देण्यासाठी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्याकडे खेड पंचायत समितीचे बांधकाम विभागाचे शाखा अभियंता अशोक वानखेडे हे वीस हजार रुपये लाच मागत होते. पिंपरी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्याने लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदविली होती.
त्यांच्या तक्रारीनुसार सोमवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पंचायत समितीच्या आवारातील बांधकाम विभागाच्या कार्यालयात लाचलुचपत पथकाने सापळा रचला. त्यात वीस हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या पोलीस अधिकाऱ्यांनी शाखा अभियंता अशोक वानखेडे यांना रंगेहाथ पकडले. रात्री उशिरापर्यंत भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरूहोती. लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक कांचन जाधव, पोलीस निरीक्षक अरुण घोडके यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Strike of the branch engineer while taking bribe