शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे शहरावर आता राहणार २४०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा 'कडक वॉच' : अमिताभ गुप्ता यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2020 22:13 IST

पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहरात सर्वप्रथम १२३४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते.

ठळक मुद्देआता २४०० कॅमेऱ्यांची राहणार नजर : जानेवारीपर्यंत होणार पूर्ण

पुणे : शहरात सीसीटीव्हीचे जाळे वाढविण्यास शासनाची परवानगी मिळाली असून आता नव्याने १४०६ सीसीटीव्हीपुणे शहरात बसविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली. 

पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहरात सर्वप्रथम १२३४ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय स्वतंत्र झाल्यावर पुणे शहरात जवळपास १ हजार कॅमरे राहिले होते. राज्यात सर्वप्रथम सीसीटीव्हीची योजना पुण्यात राबविली गेली असल्याने तेव्हाचे तंत्रज्ञान आता जुने झाले आहेत. तसेच अनेक कॅमेऱ्यांची क्षमता संपली आहे.त्यामुळे आणखी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. जुने कॅमेरे बदलून तसेच नवीन १४०६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यास मंजुरी मिळाली असून हे काम जानेवारीपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. 

वाहतूक, आर्थिक गुन्हे शाखेची पूर्नरचनापोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी गुन्हे शाखेची पुर्नरचना केल्यानंतर आता वाहतूक आणि आर्थिक गुन्हे शाखेची पुर्नरचना केली आहे. आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके या काम पाहत आहेत. आर्थिक गुन्हे शाखेची झोननुसार युनिट राहणार आहेत. त्यानुसार नियमावली तयार करण्यात आली आहे़ पूर्वी ५० लाख रुपयांच्या पुढील गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला जात होता. आता ३ कोटींच्या फसवणुकीचे गुन्हे आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात येणार आहे. 

वाहतूक शाखेत आता ३ झोनवाहतूक शाखेच्या पूर्नरचनेत तीन झोन आणि नियंत्रण कार्यालय अशी रचना करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे अधिपत्याखाली साऊथ झोन, नॉर्थ झोन (मेट्रो), ईस्ट झोन अशी विभागणी असणार आहे.तीन झोनला प्रत्येकी एक सहायक पोलीस आयुक्त कामकाज पाहणार आहेत़ तसेच प्रत्येक पोलीस ठाण्यात प्रतिबंधात्मक कारवाईसाठी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या सर्व गोष्टी प्रत्यक्षात उतरविण्याच्या कामाला सुरुवात झाली असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.

टॅग्स :Puneपुणेcctvसीसीटीव्हीPoliceपोलिसcommissionerआयुक्त