शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
2
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
3
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
4
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
5
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
6
योगेंद्र यादवांचा पुन्हा दावा; भाजपाचं टेन्शन वाढणार, कुठल्या राज्यात किती जागांचा फटका?
7
प्रेम, शारीरिक शोषण, लग्न अन् तरूणाने काढला पळ; प्रेयसीने भररस्त्यात पकडून दिला चोप
8
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
9
शेअर बाजारात मोठी अस्थिरता, ४ जूनला भाजप सरकार आलं नाही तर काय असेल स्थिती?
10
राहुल गांधींच्या सभेमध्ये मंच कोसळला, नेतेमंडळींचा एकच गोंधळ उडाला
11
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
12
हिरव्या रंगाची पैठणी अन् हाय हिल्स! कान्समधील अभिनेत्रीच्या लूकची चर्चा, सोशल मीडियावर होतंय कौतुक
13
"सोनिया गांधींना तुरुंगात टाकण्याची भाषा करणारे आता...", PM मोदींचा केजरीवालांवर निशाणा
14
कान्समध्ये पुरस्कार पटकावणाऱ्या पायल कपाडिया आहेत आरोपी नंबर 25? पुढील महिन्यात कोर्टात...
15
अरे देवा! पतीने आणल्या 60 प्रकारच्या नेलपॉलिश; सासूने लावताच सून नाराज, ठेवली 'ही' अट
16
"४ जूननंतर ईडीपासून वाचण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ..."; राहुल गांधींचा हल्लाबोल
17
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी उच्चांकी स्तरावरून घसरला; Adani Ent आपटला, डिव्हिस लॅबमध्ये तेजी
19
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडले गेले...
20
"विभव कुमार यांना जामीन मिळाला तर मला आणि माझ्या...", स्वाती मालीवाल यांचा कोर्टात मोठा दावा

सावधान! लग्न व अन्य समारंभात नियमांचे उल्लंघन केल्यास पडेल महागात; पुण्यासाठी कडक निर्बंध 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2020 7:31 PM

पुणे जिल्ह्यात लग्न समारंभ व अन्य कार्यक्रमांवर पुन्हा कडक निर्बंध; कडक अंमलबजावणी करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश 

पुणे: गेल्या काही दिवसांत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. लग्न समारंभ व इतर कार्यक्रमा निमित्त होणारी गर्दी आणि मास्क न वापरणे, सुरक्षित सामाजिक अंतर न राखणे यामुळेच ही परिस्थिती ओढावली आहे. त्यात लाॅकडाऊनचे सर्व निर्बंध उठवल्याने ही संख्या अधिक झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवरच जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी लग्न समारंभ आणि अन्य कार्यक्रमांवर कडक निर्बंध घातले आहेत. या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश देखील देशमुख यांनी दिले आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशामध्ये कार्यालय मालकाकडून नियम व अटीचे पालन करणार असल्याचे हमीपत्र घ्यावे. पन्नास व्यक्तीची उपस्थिती ही संख्या आचारी, मदतनीस, वाढपे, वाजंत्री, भटजी, फोटोग्राफर व्हिडीओ चालक, सुत्रसंचालक यांच्यासह गृहीत धरावी. मंगल कार्यालय व्यवस्थापक / मालक यांनी लग्न समारंभाचे प्रवेशव्दारावर ऑक्सीमीटर, इन्फ्रा थर्मामीटर(थर्मल स्कॅनिंग गन) चा वापर करावा. प्रवेशव्दाराजवळ उपस्थितांचे नाव, मोबाईल क्र व स्वाक्षरी घ्याव्यात .ऐवढेच नाही तर विवाह समारंभ व अन्य कार्यक्रम झाल्यानंतर चित्रीकरणाची सीडी पाच दिवसात पोलीस ठाण्यात सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमांचे उल्लंघन करणा-यावर थेट गुन्हे दाखल करा व मंगल कार्यालयांचे लायसन्स रद्द करण्याचे आदेश देखील देशमुख यांनी दिले आहे.हे आहेत पुणे जिल्ह्यासाठीचे नवीन नियम - लग्न समारंभासाठी हजर राहणाऱ्या 50 जणांची नावे पोलीस ठाण्यात सादर करावीत. (ही संख्या आचारी, मदतनीस, वाढपे, वाजंत्री, भटजी, फोटोग्राफर व्हिडीओ चालक, सुत्रासचालक यांच्यासह राहील) कार्यालय मालकाकडून नियम व अटीचे पालन करणार असल्याचे हमीपत्र घ्यावे.- लग्न समारंभाचे ठिकाणी जास्तीत जास्त 50 व्यक्ती उपस्थित राहतील व त्यांच्यामध्ये सामाजिक अंतर (सोशल डिस्टंसिंग) सहा फुट राखणे बंधनकारक राहील. लग्नसमारंभाचे ठिकाणी बसण्यासाठी व जेवण करताना सामाजिक अंतर राहील अशा पध्दतीने खुणा (मार्किग) कराव्यात. जेवण करताना मास्क काढल्यानंतर एकमेकांशी गप्पा मारण्यावर निबंध ठेवावेत.- लग्न समारंभाचे ठिकाणी उपस्थित सर्व नागरिक, वाढपे, आचारी, वाजंत्री, भटजी व वन्हाडी मंडळी यांनी मास्क वापरणे बंधनकारक राहील.- लग्न समारंभाचे ठिकाणी गुटखा, पान, तंबाखू खाऊन धुंकणे व असेही थुकणेस व मद्यपान करण्यास सक्त मनाई राहील. आणि त्याचे उल्लंघन केल्यास सदरील व्यक्ती दंडनिय कारवाईस पात्र राहील.- लग्नसमारंभासाठी विनावातानुकूलित मंगल कार्यालय / हॉल / खुले लॉन / सभागृह वापरणेत यावी. कोणत्याही परिस्थीतीत वातानुकूलित सेवेचा (AC) चा वापर करणेत येऊ नये.- मंगल कार्यालय व्यवस्थापक / मालक यांनी लग्न समारंभाचे प्रवेशव्दारावर ऑक्सीमीटर, इन्फ्रा थर्मामीटर (थर्मल स्कॅनिंग गन) चा वापर करावा. प्रवेशव्दाराजवळ उपस्थितांचे नाव, मोबाईल क्र व स्वाक्षरी घ्यावी- लग्न समारंभाची जागा, वारंवार हाताळले जाणारे भाग, खुच्च्या, लग्नाचा संपूर्ण हॉल, किचन, जेवणाचे ठिकाण, स्वच्छतागृह इत्यादी ठिकाणी सॅनिटायझरचा वापर करुन वारंवार निजतुकीकरण करावे. तसेच स्वच्छतागृहात हात धुण्यासाठी साबणाची व्यवस्था करावी.- सोशल डिस्टन्सचा वापर व अन्य नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी होण्यासाठी एक किवा दोन प्रतिनिधी नेमावेत.- लग्न समारंभात कोरोना विषाणूचा प्राद्र्भाव रोखण्यासाठी व सर्व नियम व अटी पालन करण्याबाबत जनजागृती करावी.- लग्नसोहळयाचा सर्व विधीची पाहणी करण्यासाठी पोलीस पाटील, ग्रामसेवक, कामगार तलाठी व पोलीसयांचे भरारी पथक कार्यरत करावे. या ठिकाणी नियमांचे उलंघन झाल्यास गुन्हे दाखल करावेत.- लग्न समारंभाचे ठिकाणी नागरिकांनी सामाजिक अंतराचे व वरील सर्व नियम व अटींचे पालन करतनसल्याचे निदर्शनास आले तर सदर भागातील खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय / हॉल / सभागृह तात्काळ बंद करणेत येतील, विवाह समारंभ व अन्य कार्यक्रम झाल्यानंतर चित्रीकरणाची सीडी पाच दिवसात पोलीस ठाण्यात सादर करावी.

टॅग्स :marriageलग्नcorona virusकोरोना वायरस बातम्या