शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवात गर्दी केल्यास कडक निर्बंध लावण्यात येणार; अजित पवार यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2021 07:35 IST

पुणे शहराचा पाॅझिटिव्हिटी दर कमी असला तरी ग्रामीण भागाचा पाॅझिटिव्हिटी दर अपेक्षित प्रमाणात कमी झालेला नाही.

पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात नवे निर्बंध लावण्याचा कोणताही विचार नाही. परंतु, लोकांनी खबरदारी न घेता गणेशोत्सवात गर्दी केल्यास दुसऱ्या दिवसांपासूनच कडक निर्बंध लावण्यात येतील, असा इशारा उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिला.साप्ताहिक कोरोना आढावा बैठक झाल्यानंतर शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार म्हणाले की, पुणे शहराचा पाॅझिटिव्हिटी दर कमी असला तरी ग्रामीण भागाचा पाॅझिटिव्हिटी दर अपेक्षित प्रमाणात कमी झालेला नाही. जिल्ह्यात कोरोनाचा धोका कमी झाला नसून सणासुदीला गर्दी करून तिसऱ्या लाटेला आमंत्रण देऊ नका.

इंधन दरवाढीबाबत केंद्रावर टीका

‘दहा महिन्यांपासून राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. मोदी सरकारकडून कोणतीही दखल घेतली जात नाही, हे जनतेचं दुर्दैव आहे,’  अशी टीका अजित पवारा यांनी यावेळी केली. कोरोनामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना इंधन दरवाढीचा फटका बसत आहे. तो नियंत्रित करण्यासाठी कोणतीही उपाययोजना केली जात नाही. मोदी सरकारने दिलेले हे ‘अच्छे दिन’ आहेत,’ असे पवार म्हणाले.

केंद्र सरकार काय म्हणते, माहिती घ्या 

‘काही लोक मंदिरं उघडण्यासाठी आंदोलन  करीत आहेत, पण मंदिराचा मुद्दा हा राजकीय हेतूने आणला जात आहे. केंद्र सरकारनेच सांगितले की, खबरदारी घ्या, मग हे राजकारण कशासाठी करताहेत?”- अजित पवार

... तरीही गाफील  राहून चालणार नाही 

‘कोरोनाबाधितांची रुग्णसंख्या व पॉझिटिव्हिटी रेट कमी असला तरी गाफील राहून चालणार नाही.  पर्यटनस्थळावर होणारी गर्दी कमी करण्यासाठी निर्बंधांची कडक  अंमलबजावणी करा,” असा आदेश अजित पवार यांनी दिला.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारGanesh Mahotsavगणेशोत्सव