शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

अनावश्यक साखळी ओढून रेल्वे थांबवणाऱ्यांवर कडक कारवाई; ७ लाख दंड वसूल तर १४४० जणांना अटक

By अजित घस्ते | Updated: July 4, 2024 19:52 IST

किरकोळ कारणासाठी अनावश्यक साखळी ओढून दुरुपयोग करणाऱ्या प्रवाशांना अटक तर काहींकडून दंड वसूल

पुणे : रेल्वेतून प्रवास करताना एखाद्यावेळी अपघात किंवा आपत्कालीन परिस्थितीत साखळी ओढून (अलार्म चेन) रेल्वे थांबविण्यासाठी डब्यात अलार्म चेन असते. रेल्वेने ही चेन फक्त आपत्कालीन काळात वापरण्यासाठीच बंधनकारक केली आहे; परंतु काही प्रवासी किरकोळ कारणासाठी अनाआवश्यक या चेनचा दुरुपयोग करतात. अशा प्रवाशांवर एप्रिल २०२३ ते २८ जून २०२४ या कालावधीत पुणे रेल्वे विभागात १९९२ गुन्हे दाखल करण्यात आले असून, १४४० जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ७ लाख ७३ हजार दंड वसूल करण्यात आला आहे.

रेल्वेतून प्रवास करताना कधी जीवघेणा प्रसंग उद्भवला किंवा अपघात झाला, कुठे आग लागली, अशावेळी प्रवाशांच्या जीविताला धोका होऊ नये, यासाठी साखळी ओढण्यासाठी परवानगी आहे. परंतु काही प्रवासी किरकोळ कारणांसाठी याचा वापर करताना दिसून आले. त्यामुळे इतर प्रवाशांना याचा त्रास होतो. परिणामी गाडी थांबविल्यामुळे वेळेत पोहोचण्यासाठी विलंब होतो. त्यामुळे पुढील सर्व गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत होते. काहीवेळा तर प्रवाशांना स्टेशनवर पोहचायला उशीर झाल्यामुळे गाडी थांबविण्यासाठी पुलिंग चेन ओढताना आढळून आले आहे. अशा प्रवाशांना रेल्वेच्या कायद्यानुसार कलम १४१ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

गैरवापर करू नये यासाठी जनजागृती...

एक किंवा काही प्रवाशांच्या सोयीसाठी अलार्म चेनचा गैरवापर झाल्याने इतर सर्व प्रवाशांची गैरसोय होते. अशा अनुचित घटना होऊ नयेत, यासाठी रेल्वे विभागाकडून सतत जनजागृती केली जाते. स्टेशनवर अलाऊन्स करून सूचना देण्यात येते. रेल्वेच्या डब्यातदेखील या संबंधित माहिती लिहिलेली असते. तरीही काही प्रवासी याचा गैरवापर करताना आढळून येतात.

मध्य रेल्वे विभागात ६३ लाख दंड वसूल...

एप्रिल २०२३ ते २८ जून २०२४ या काळात अलार्म चेन ओढण्याच्या मध्य रेल्वेने ११ हजार ४३४ प्रकरणे नोंदवली. रेल्वे कायद्याच्या १४१ नुसार ९ हजार ६५७ व्यक्तींवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ६३ लाख २१ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.यामध्ये पुणे रेल्वे विभागात १९९२ गुन्हे दाखल करण्यात आले असून, १४४० जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ७ लाख ७३ हजार दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे गरज असेल तेव्हा अलार्म चेन ओढण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

टॅग्स :PuneपुणेRailway Passengerरेल्वे प्रवासीPoliceपोलिसMONEYपैसा