शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

राज्य उत्पादन शुल्कच्या कामावर ताण; पुणे विभागात २९७ पदे मंजूर तर ९१ रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 12:12 IST

पुणे विभागाकडे मनुष्यबळाची कमतरता असल्याने ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कामाचा ताण वाढला आहे. मागील अनेक वर्षांपासून राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये पदे भरली गेली नाहीत.

ठळक मुद्देएकूण २९७ पदे मंजूर आहेत. त्यापैकी २०६ पदे कार्यरत असून ९१ पदे रिक्तचालू वर्षात २ हजार १६० कारवाया, ५ कोटी ५२ लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

पुणे : संपूर्ण पुणे विभागाकडे मनुष्यबळाची कमतरता असल्याने ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर कामाचा ताण वाढला आहे. मागील अनेक वर्षांपासून राज्य उत्पादन शुल्क विभागामध्ये पदे भरली गेली नाहीत. एकूण २९७ पदे मंजूर आहेत. त्यापैकी २०६ पदे कार्यरत असून ९१ पदे रिक्त आहेत. राज्य उत्पादनच्या पुणे विभागाकडे अधीक्षकांसह उपअधीक्षक, निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, वरिष्ठ लिपिक, लिपिक-टंकलेखक, सहायक दुय्यम निरीक्षक, वाहनचालक, जवान अशी एकूण २९७ पदे मंजूर आहेत. गेल्या वर्षीपेक्षा यंदाच्या वर्षामध्ये पुणे विभागाच्या महसूलामध्ये ८ टक्के वाढ झाली आहे. राज्यातील अन्य विभागांपेक्षा चांगली वाढ पुणे विभागात झालेली आहे. राज्य व राष्ट्रीय महामार्गांवरील ५०० मीटरच्या आतील मद्यबंदीच्या निर्णयानंतरही वाढ झालेली आहे. या विभागाकडून मद्यावरील महसूल गोळा करण्यासोबतच परवाने देण्याचे काम केले जाते. मद्यसाठा, परवाने आणि महसूल याची तपासणी करणे ही मुख्य जबाबदारीही या विभागाकडे आहे. मंजूर मनुष्यबळामध्ये प्रत्यक्ष कारवाईचा अधिकार असलेले अवघी ७४ पदे आहेत. नाताळ आणि ३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर एक दिवसीय परवाने देण्याचे काम सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर मनुष्यबळाची कमतरता भासू लागली आहे. चालू वर्षामध्ये २ हजार १६० कारवाया करण्यात आल्या असून ५ कोटी ५२ लाख ४९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. २०१६ मध्ये २ हजार २५० कारवाया करण्यात आल्या होत्या. तर, ५ कोटी २८ लाख ९८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. गेल्या वर्षीपेक्षा २३ लाख ५१ हजारांचा अधिक मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

रिक्त पदांची आकडेवारी
उपअधीक्षक ०२
निरीक्षक०८
दुय्यम निरीक्षक ५२
वरिष्ठ लिपिक ०१
लिपिक-टंकलेखक०२
स़ दुय्यम निरीक्षक १२
वाहनचालक ०२
जवान१२
एकूण    ९१

 

टॅग्स :Employeeकर्मचारीPuneपुणे