शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भटक्या कुत्र्यांचा चिमुकल्यावर हल्ला ; पुण्यातल्या धानाेरी भागातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 11:10 IST

पुण्यात भटक्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून रविवारी भटक्या कुत्र्यांनी एका चिमुकल्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे.

धानाेरी : नऊ वर्षांच्या चिमुकल्याला तीन भटक्या कुत्र्यांनी चावा घेऊन जखमी केल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी घडली. धानोरी येथील पॅलेडियम सोसायटीतील योहान शैलेश नाईक हा  चिमुकला भटक्या कुत्र्यांच्या हल्यात जखमी झाला.या गंभीर घटनेनंतर त्याच्या पालकांनी केलेल्या तक्रारी नंतर महानगरपालिका प्रशासनाने पाच भटकी कुत्री पकडून नेली.तर आणखी वीस ते पंचवीस भटक्या कुत्र्यांचा वावर अजूनही त्या परिसरात असून तात्काळ कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. 

रविवारी दुपारी योहान सोसायटीतील मोकळ्या जागेत मित्रांसोबत खेळत होता. अचानक तीन भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला. त्याच्या मांडीला कुत्र्यांनी दोन ठिकाणी चावे घेतले. तर अचानक झालेल्या या हल्यात खाली पडल्यामुळे त्याला चांगलाच मुका मार देखील लागला. त्याच्या पालकांनी त्याला तात्काळ खाजगी रूग्णालयात नेऊन उपचार केले. या घटनेमुळे चिमुकल्या योहानसह सोसायटीतील इतर लहान मुले व नागरिक देखील धास्तावले आहेत.या प्रकरणी त्याच्या पालकांनी सोमवारी महानगरपालिका प्रशासनाला लेखी तक्रार देऊन भटक्या कुत्र्यांवर कारवाईची मागणी केली. त्यानुसार तात्काळ पाच भटक्या कुत्र्यांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती डाॅ. प्रकाश वाघ यांनी दिली.भटक्या कुत्र्यांच्या समस्येबाबत शहरात वांरवार कारवाई सुरू असते.नियमानुसार भटकी कुत्री पकडून नसबंदी करून पुन्हा सोडून द्यावे लागते.मात्र असे अपघात घडू नयेत यासाठी जास्तीत जास्त खबरदारी घेऊन कारवाई करणार असल्याचे डाॅ. वाघ यांनी सांगितले. 

टॅग्स :dogकुत्राPuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका