शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
3
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
4
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
5
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
6
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
7
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
8
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
9
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
10
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
11
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
12
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
13
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
14
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
15
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
16
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?
17
३ वर्षात १ लाखाचे झाले १५ लाखांपेक्षा अधिक, ६ महिन्यांत १८०% नं वधारला स्टॉक
18
"हे विजयाचं परिमाण असू शकत नाही, भारताने...!"; भारत-पाकिस्तान सामन्यासंदर्भात काय म्हणाले ओवेसी?
19
Royal Enfield ने जारी केली यादी; Hunter, Classic, Meteor..; पाहा सर्व गाड्यांची नवी किंमत

आजारी बहिणीचा गळा दाबून खून केला, आत्महत्येचा बनाव रचला; हडपसरमधील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2024 11:14 IST

आजारी असलेल्या तरुणीने आत्महत्या केली असल्याची तक्रार त्याने दाखल केली, मात्र तपासात सत्य बाहेर आल्यानंतर ताे खून आपण केल्याची कबुली १८ वर्षीय भावाने दिली...

पुणे : सख्ख्या १६ वर्षीय बहिणीचा गळा दाबून खून केल्याचा प्रकार हडपसरमधील वैदुवाडी परिसरात उघडकीस आला. आजारी असलेल्या तरुणीने आत्महत्या केली असल्याची तक्रार त्याने दाखल केली, मात्र तपासात सत्य बाहेर आल्यानंतर ताे खून आपण केल्याची कबुली १८ वर्षीय भावाने दिली. याप्रकरणी हडपसर पाेलिस ठाण्यात दाखल सुरुवातीला अकस्मात झालेली मृत्यूची नाेंद बदलून तरुणाविराेधात शनिवारी (दि.२२) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. हा प्रकार साेमवारी (दि.१७) राेजी घडला.

साफिया सुलेमान अन्सारी (१६, रिद्धीसिद्धी अपार्टमेंट, वैदवाडी, हडपसर) असे मृत तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी तिचा भाऊ शारीख सुलेमान अन्सारी (१८) याच्याविरोधात खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत साफिया आजारी असायची. तिच्यावर कुटुंबीयांकडून उपचारही केले जात होते. मात्र तिच्यात काही फरक पडत नव्हता. घरात असताना ती आक्रमक व्हायची. घरातील सदस्यांच्या अंगावर धावून जायची. घटनेच्या दिवशी म्हणजेच १७ जून रोजीदेखील असाच प्रकार घडला. मयत साफिया भाऊ शारीख याच्या अंगावर त्याला मारण्यासाठी धावून गेली. दोघांत झटापट झाली. त्यानंतर रागाच्या भरात शारीख याने तिचा गळा दाबला, यात साफियाचा मृत्यू झाला.

त्यानंतर आपल्या हातातून गुन्हा घडल्याचे लक्षात आल्यानंतर शारीख घाबरला. आपले कृत्य लपवण्यासाठी त्याने घरातच साफियाला गळफास दिला आणि आत्महत्या केली, असे भासवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले, मात्र त्याआधीच साफियाचा लटकलेला मृतदेह खाली काढण्यात आला होता. सुरुवातीला याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद म्हणून दाखल करण्यात आला होती. मात्र त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने खून केल्याची कबूल दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) मोडवे करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHadapsarहडपसरPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड