मोकाट कुत्र्यांचा खडकीकरांना त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2015 23:37 IST2015-06-18T23:37:52+5:302015-06-18T23:37:52+5:30

परिसरातील नागरिकांना मोकाट कुत्र्यांचा त्रास होत आहे. यापूर्वी मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी खडकीकरांनी वारंवार केली

Strangers harass the rocker dogs | मोकाट कुत्र्यांचा खडकीकरांना त्रास

मोकाट कुत्र्यांचा खडकीकरांना त्रास

खडकी : परिसरातील नागरिकांना मोकाट कुत्र्यांचा त्रास होत आहे. यापूर्वी मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी खडकीकरांनी वारंवार केली असून, बोर्ड प्रशासन याकडे दुर्लक्षच करीत आहे.
बोर्ड प्रशासनाच्या या भूमिकेमुळे नागरिकांच्या समस्येत भर पडत असून, सामाजिक आरोग्य बिघडत आहे. खडकीतील डॉ. आंबेडकर रस्त्यावर भटक्या कुत्र्यांचा अहोरात्र उच्छाद सुरू आहे. यामुळे नागरिकामध्ये भीतीचे वातावरण आहे. अ‍ॅम्युनिशन कारखाना, एमएसइबी चौक, शेवाळे इमारत, कुरेशीनगर, मेहता इमारत, खडकी बसस्थानक, हिमगिरीनाथ सोसायटी, रेंजहिल्स, साप्रस येथे भटक्या कुत्र्यांचा त्रास अधिक आहे. प्रशासनाने भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठीचे टेंडरही मागविले होते. परंतु, याचा काहीही उपयोग झाला नाही. अनेकांना या कुत्र्यांनी चावा घेतला असून, लहान खेळणारी मुले व वृद्ध जोडपी यास बळी पडलेले आहेत. प्रशासनाने भटक्या प्राण्यांसाठी कोंडवाडा तयार केला. पण, त्याची दुर्दशा होऊन लाखो रुपयांची रक्कम वायाच गेली.
बोर्डाच्या रुग्णालयात श्वानदंशावर इंजेक्शन उपलब्ध आहे. परंतु, अनेकदा ते बाहेरून आणावयास सांगितले जाते. नसबंदी करूनसुद्धा कुत्र्यांची संख्या वाढतच आहे. मनपा हद्दीतील भटकी कुत्रीसुद्धा खडकीतील रेंजहिल्स भागात गाडीत आणून सोडली जाताना निदर्शनास आले आहे. यामुळे खडकीत कुत्र्यांची संख्या वाढली आहे. (वार्ताहर)

Web Title: Strangers harass the rocker dogs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.