शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात नवले ब्रिजजवळ विचित्र अपघात; भरधाव ट्रकची पाच वाहनांना धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2020 15:35 IST

सांगलीवरून पनवेल येथे साखर घेऊन निघालेला ट्रकचे अचानक इंजिन बंद पडल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले.

ठळक मुद्देवाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान, एकजण किरकोळ जखमी

पुणे ( धायरी) : मुंबई-बंगळुरू महामार्गावर विचित्र अपघात घडला. ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे समोर असणाऱ्या पाच वाहनांना धडक दिली.या अपघातात एक जण किरकोळ जखमी झाला आहे , मात्र वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही घटना सोमवारी सकाळी आठच्या सुमारास वडगांव बुद्रुक येथील हॉटेल विश्वास समोर घडली. ह्याबाबत ट्रकचालक चित्रपाल जंडल सिंग (वय२९, मूळ. मध्यप्रदेश, सध्या राहणार: सांगली) याच्याविरोधात सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ट्रकचालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 

सांगलीवरून पनवेल येथे २५ टन साखर घेऊन निघालेला माल ट्रक ( एमएच-१२. एचडी. १८२८) सकाळी आठच्या सुमारास वडगाव पुलाजवळ आला असता अचानक इंजिन बंद पडल्याने ट्रकचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे पुढे असणाऱ्या ३ चारचाकी वाहनांना व एका रिक्षाला तसेच एका दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला आहे. अशोककुमार शर्मा ( वय:३०, नऱ्हे,पुणे) असे जखमी व्यक्तीचे नाव असून त्यांना जवळच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने चारचाकी वाहनांमध्ये असणाऱ्या प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही. मात्र वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

उपाययोजनांकडे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष ?नवीन कात्रज बोगदा ते वडगाव पुलादरम्यान महामार्गावर तीव्र उतार असून त्यासाठी तिथे वाहनांचा वेग कमी करण्यासाठी ५० अथवा १०० फुटापर्यंत पांढरे पट्टे करणे गरजेचे आहे. शिवाय ठिकठिकाणी फलक लावणे गरजेचे आहे. प्रशासनाने यासंदर्भात कोणत्याही प्रकारच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात केली नाही.वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सुचविलेल्या उपाययोजनांकडे राष्ट्रीय महामार्ग प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष तर करत नाही ना? असा सवाल येथील नागरिक करीत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघात