पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळातील (पीएमपी) कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण येत असल्याने ते दडपणाखाली काम करीत आहेत. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमधील तणाव वाढत असल्याने तक्रार निवारण समिती स्थापन करावी, अशी मागणी पीएमपीएमएल राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनने केली आहे. याबाबतचे पत्र युनियनचे अध्यक्ष किरण थेऊरकर यांनी पीएमपीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांना दिले आहे. प्रत्येक विभागातील मनुष्यबळ कमी करण्यात आल्याने सर्व कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत आहे. सर्व अधिकारी व कर्मचारी हवालदिल झाले असून दडपणाखाली काम करीत आहेत. यामध्ये त्यांच्यामध्ये अंसतोष वाढत आहे. त्यामुळे प्रशासन व कर्मचारी यांच्यात सलोख्याचे संंबंध निर्माण होणे आवश्यक असल्याने कामगार कायद्यानुसार तक्रार निवारण समिती स्थापन करावी, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
पीएमपी कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण; तक्रार निवारण समिती स्थापन करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2018 15:42 IST
पुणे महानगर परिवहन महामंडळातील (पीएमपी) कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण येत असल्याने तक्रार निवारण समिती स्थापन करावी, अशी मागणी पीएमपीएमएल राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनने केली आहे.
पीएमपी कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण; तक्रार निवारण समिती स्थापन करण्याची मागणी
ठळक मुद्देयुनियनचे अध्यक्ष किरण थेऊरकर यांनी पीएमपीचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांना दिले पत्रसर्व कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण, सर्व अधिकारी व कर्मचारी हवालदिल