शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

बंगालच्या उपसागरात वादळ, दक्षिण ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धोक्याचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 21:35 IST

पुणे : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाने संपूर्ण पश्चिम किनारपट्टीला तडाखा दिल्यानंतर आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला

पुणे : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाने संपूर्ण पश्चिम किनारपट्टीला तडाखा दिल्यानंतर आता बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, येत्या ४८ तासांत त्याचे तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतर होण्याची शक्यता आहे. येत्या ८ डिसेंबरला ते दक्षिण ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे.गुजरातकडे गेलेले ओखी वादळ बुधवारी सकाळी विरले. या वादळामुळे गुजरात तसेच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. बुधवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत डहाणू ११०, मुंबई ८०, सांताक्रूझ ५०, माऊंट आबू, सुरत, नाशिक, बडोदा, कारवार, अहमदाबाद, वेंगुर्ला येथे प्रत्येकी १० मिमी पावसाची नोंद झाली होती.सुमात्रा बेट आणि दक्षिण अंदमान समुद्राजवळ रविवारी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून तो आता आंध्र किनारपट्टीच्या दिशेने येत आहे. सध्या बुधवारी सायंकाळी हा कमी दाबाचा पट्टा मच्छलीपट्टणमपासून १०२० किमी तर, गोपाळपूरपासून ११०० किमी अंतरावर होता. पुढील ४८ तासांत त्याचे तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतर होण्याची शक्यता आहे. नंतर त्याची तीव्रता कमी होण्याची शक्यता असून ८ डिसेंबर सायंकाळी ते उत्तर आंध्र प्रदेश ते दक्षिण ओडिशा किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आंध्र प्रदेश, ओडिशा, अंदमान निकोबार द्वीपसमूह येथील अनेक ठिकाणी ७ ते ९ डिसेंबरदरम्यान जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात समुद्र खवळलेला राहणार असल्याने आंध्र प्रदेश, ओडिशा, तामिळनाडू, अंदमान, निकोबार बेटे येथील मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.ओखी चक्रीवादळामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातील सर्वच ठिकाणच्या तापमानात वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी किमान तापमानात सरासरीपेक्षा ५ ते ८ अंश सेल्सियसने वाढ झाली आहे. मराठवाड्यात २ ते ७ अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. राज्यात सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे ९़८ अंश सेल्सियस नोंदविले गेले.पुणे शहरात बुधवारी अधूनमधून ढगाळ हवामान होत. कमाल व किमान तापमानातील अंतर कमी झाल्याने त्याचा त्रास लोकांना जाणवत होता. कमाल व किमान तापमान अनुक्रमे २७.६ आणि २१.१ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. कमाल तापमान सरासरीपेक्षा १़७ अंशाने कमी तर किमान तापमान सरासरीपेक्षा तब्बल ८.७ अंश सेल्सिअस अधिक होते. डिसेंबरमध्ये पुणे शहरातील किमान तापमान २१ अंशाच्या पुढे जाण्याची ही गेल्या काही वर्षातील पहिलीच वेळ आहे.

टॅग्स :Puneपुणे