सोमाटणे नाक्यावरील टोल रोखला

By Admin | Updated: June 9, 2015 05:47 IST2015-06-09T05:47:47+5:302015-06-09T05:47:47+5:30

मुदतीत काम सुरु न केल्याने तसेच कामाचे आदेश मिळाले नसल्याचा दावा संबंधित ठेकेदाराने केल्याने सोमवारी देहूरोडच्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी सोमाटणे टोल नाक्यावरील टोलवसुली बंद पाडली.

Stop the towel toll | सोमाटणे नाक्यावरील टोल रोखला

सोमाटणे नाक्यावरील टोल रोखला

किवळे : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील देहूरोड ते निगडी दरम्यानच्या रस्त्याच्या संरक्षक बाजूपट्ट्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरणाबाबत बैठकीत इशारा देऊन मुदतीत काम सुरु न केल्याने तसेच कामाचे आदेश मिळाले नसल्याचा दावा संबंधित ठेकेदाराने केल्याने सोमवारी देहूरोडच्या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी, आमदार संजय भेगडे व विशाल खंडेलवाल यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करीत सोमाटणे टोल नाक्यावरील टोलवसुली बंद पाडली.
देहूरोड येथील झालेल्या संयुक्त बैठकीत इशारा दिल्यानुसार, खंडेलवाल यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय आंदोलक सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास देहूरोड मुख्य बाजारपेठेतून दुचाकी रॅली काढून सोमाटणे टोलनाक्यावर साडेदहाच्या सुमारास दाखल झाले. आयआरबी व विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या धिक्काराचे फलक दाखवीत घोषणा देत टोलनाक्यावर आंदोलन सुरू केले. त्यामुळे सुमारे अर्धा तास रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सकाळी अकराच्या सुमारास आमदार भेगडे यांनी आंदोलनात सहभागी होत वाहन चालकांची गैरसोय टाळण्यासाठी वाहने टोल न घेता पुढे जातील, अशी घोषणा केल्याने सर्व वाहने टोल न भरता पुढे सोडण्यात आली.(वार्ताहर)

टोलवसुली सुरू
सायंकाळी तळेगाव पोलीस ठाणे येथे बैठकीनंतर टोल वसुलीला परवानगी देण्यात आली. सुमारे तासभर टोलवसुली बंद होती. आमदार बाळा भेगडे, भाजप तालुकाध्यक्ष रामनाथ वारिंगे, भाजयुमाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब वारिंगे, प्रशांत ढोरे, नगरसेवक चंद्रभान खळदे, गणपतराव काळोखे, जयंत कदम आदी उपस्थित होते. मंगळवारी सकाळी मंत्रालयात (मुंबई) निगडी-देहूरोड टप्प्यातील संपूर्ण कामाचे आदेश देण्याबाबत उद्यारस्ते विकास मंत्रालयाचे सहसचिव अनिल डिग्गीकर, आरआरबी अधिकाऱ्यांसमवेत बैठक होणार असल्याचे आमदार भेगडे यांनी सांगिंतले.
--------------------------
देहूरोड ते निगडी रस्ता मृत्यूचा सापळा बनल्याने येत्या दोन महिन्यांत चौपदरीकरण कामाला व उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात होणार आहे. संबंधित रस्त्याच्या बाजूपट्ट्या खचल्याने वारंवार अपघात होत असल्याने गेल्या आठवड्यात देहूरोड येथे झालेल्या संयुक्त बैठकीत बाजूपट्ट्यांचे चार दिवसांत मजबुतीकरण व डांबरीकरण करण्याबाबत इशारा देण्यात आला होता. मुदतीत काम न झाल्याने सोमवारी सोमाटणे येथील टोल वसुली थांबविली आहे. नाक्याला टाळे ठोकण्यात आले असून चाव्या माझ्याकडे राहणार आहेत. आरआरबीच्या वरिष्ठ अधिकार्यांनी भूमिका स्पष्ट करावी. - संजय भेगडे, आमदार
----------------------------
पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारचे देहूरोड ते निगडी दरम्यान देहूरोड बाजारभागातील फक्त सातशे मीटर लांबीच्या बाजूपट्ट्या मजबुतीकरण व डांबरीकरणाचे आदेश दिले असून, उर्वरित सुमारे साडेपाच किलोमीटर कामाबाबत आमदार भेगडे, महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी व म्हैसकर इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट कंपनी या ठेकेदार कंपनीचे वरिष्ठ अधिकारी यांची बैठक घेण्यात येणार असून, त्यात उर्वरित कामाच्या प्रस्तावावर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे.
- संजय गांगुर्डे, कार्यकारी अभियंता, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ, मुंबई

Web Title: Stop the towel toll

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.