शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

अनधिकृत बांधकामांची खरेदी-विक्री बंद करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2018 01:51 IST

२,३०० बांधकामांना नोटीस; ३६ कोटींचा महसूल जमा

पुणे : पुणे शहरालगतच्या २५ गावांत २,३०० अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. या सर्व बांधकामांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यांतील१९९ अनधिकृत बांधकामांची खरेदी-विक्री थांबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त किरण गित्ते यांनी पत्रकार परिषदेत दिली.शहरालगतच्या चारही बाजूंनी जवळपास २५ गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. आंध्र प्रदेशातील ठेकेदार ‘कमी कालावधीत, कमी खर्चात’ ही बांधकामे वेगाने करून देत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पीएमआरडीएच्या वतीने धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. आतापर्यंत २,३०० अनधिकृत बांधकामांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यातील १११ बांधकामे पाडण्यात आली असून, ३८५ बांधकामे दंड भरून नियमित करण्यात आली आहेत.दंडापोटी पीएमआरडीएला ३६ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. तर, १९० अनधिकृत बांधकामांची यादी तयार करण्यात आली असून, निष्कासनाची कार्यवाही लवकरच करण्यात येईल. अनधिकृत बांधकामे पाडण्याची कारवाई तीन टप्प्यांत करण्यात येत आहे. अनधिकृत बांधकाम करणाऱ्या विकसकाला प्रथम या संदर्भात नोटीस देण्यात येते. त्याबाबत अनेक विकसक स्वत:हून बांधकामे पाडतात, त्यानंतर रहदारीच्या परिसरातील अनधिकृत बांधकामे प्रथम पाडली जात आहेत. त्यामध्ये मुख्यत: पोलीस संरक्षण, महसूल विभागाचे सहकार्य घेण्यात येते. बºयाचदा बांधकामे पाडताना अनधिकृत बांधकामे करणारा विकसक स्वत: विरोध करतो. त्यानंतर राजकीय क्षेत्राबरोबर इतर संस्था-संघटनांचाही दबाव येतो. त्यामुळे पुरेशा प्रमाणात अनधिकृत बांधकामे पाडणे शक्य होत नाही. तरी आम्ही कठोर कार्यवाही करण्याचा प्रयत्न करीत आहोत.आंध्र प्रदेशाची गॅँग अनधिकृत बांधकामे करण्यात सक्रियशहरालगतच्या २५ गावांमध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. बºयाच वेळेला रीतसर परवानगी घेऊन बांधकामे करणाºया लोकांची बांधकामे धिम्या गतीने सुरू असतात. मात्र, याउलट कमी कालावधीत, कमी खर्चात, परवानगी न घेता अनधिकृत बांधकामे जोरात सुरू असल्याचे चित्र दिसते. विशेषत: हवेली तालुक्यातील मांजरी आणि मुळशी तालुक्यातील मारुंजी येथे असे प्रकारे सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मागील काही महिन्यांत याबाबत मोहीम हाती घेऊन जागामालकाबरोबर आंध्र प्रदेशामधील अनेक ठेकेदारांवरही कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे अशा प्रकारांना अंकुश बसत आहे, असे पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी सांगितले.पीएमआरडीएचा विकास आराखडा जानेवारीत जाहीर करणारपीएमआरडीएचा अडीच हजार कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी मिळाली आहे. मेट्रो, रिंगरोड, अग्निशमन यंत्रणा, पाणी प्रकल्प, कचरा प्रकल्प आणि रिंगरोड मार्गावर टाऊन प्लॅनिंग योजना (टीपी) आदी शहर आणि जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाची कामे करण्यात येत आहेत. पुढील चार महिन्यांत या सर्वांचा सविस्तर प्रस्ताव तयार करण्यात येईल. त्यामुळे जानेवारी २०१९ पर्यंत पीएमआरडीएचा विकास आराखडा (डीपी) जाहीर करण्यात येणार असल्याचे या प्रसंगी किरण गित्ते यांनी सांगितले.

टॅग्स :Real Estateबांधकाम उद्योगPuneपुणे