लैंगिक अत्याचाराच्या घटनांना आळा घालणार

By Admin | Updated: November 21, 2014 03:54 IST2014-11-21T03:54:18+5:302014-11-21T03:54:18+5:30

शहरातील शाळांमध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. या घटनांना आळा घालण्यासाठी शासनाकडून तत्काळ कार्यवाही केली जाईल

To stop the incidents of sexual assault | लैंगिक अत्याचाराच्या घटनांना आळा घालणार

लैंगिक अत्याचाराच्या घटनांना आळा घालणार

पुणे : काही महिन्यांपासून शहरातील शाळांमध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. या घटनांना आळा घालण्यासाठी शासनाकडून तत्काळ कार्यवाही केली जाईल, असे राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
शहरातील नामांकित शाळांमध्ये स्कूलबस चालक तसेच शिक्षकां- कडूनसुद्धा लहान मुलींवर लैंगिक अत्याचार केले जात आहेत. त्यावर शासनाकडून काही उपाययोजना केल्या जाणार आहेत का, या प्रश्नाला उत्तर देताना तावडे म्हणाले, ‘‘लैंगिक अत्याचाराचा विषय केवळ शिक्षण व गृह खात्याशी निगडित आहे. काही वेळा शाळा प्रशासनाकडून विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारींची दखल घेतली जात नाही. त्यामुळे अशा घटना समोर येतात; परंतु त्याला आळा घालण्यासाठी शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक पावले उचलली जातील.

Web Title: To stop the incidents of sexual assault