शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

हुबळी एक्स्प्रेसला जेजुरी स्थानकात थांबा द्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2020 14:37 IST

जेजुरी हे तीर्थक्षेत्राचे ठिकाण असून तेथे खंडेरायाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राबाहेरूनही भाविक येतात. जेजुरी व नीरा स्थानकातून दिवसा मुंबईकडे जाणारी व येणारी कोयना एक्स्प्रेस चार महिन्यांपासून बंद

ठळक मुद्देभाविकांची मागणी : रेल्वेचे महाप्रबंधक संजीव मित्तल यांना निवेदनजेजुरी व नीरा स्थानकातून मुंबईकडे जाणारी व येणारी कोयना एक्स्प्रेस चार महिन्यांपासून बंद आंध्र प्रदेश, कर्नाटक येथून येणाऱ्या भाविकांची संख्या ही मोठी

जेजुरी : लोकमान्य टर्मिनस ते हुबळी एक्स्प्रेस रेल्वेगाडीलाजेजुरीरेल्वे स्थानकात एक मिनिटाचा थांबा मिळावा, अशी मागणी जेजुरी ग्रामस्थ व प्रवाशांकडून रेल्वेचे महाप्रबंधक संजीव मित्तल यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली. रेल्वेचे महाप्रबंधक संजीव मित्तल हे आज जेजुरीला रेल्वे स्थानकाच्या पाहणीसाठी आले होते. स्थानिक नागरिक व प्रवाशांच्या वतीने राजू पानसरे यांनी या मागणीचे निवेदन त्यांना दिले. त्याचबरोबर जेजुरी व नीरा स्थानकातून दिवसा मुंबईकडे जाणारी व येणारी कोयना एक्स्प्रेस चार महिन्यांपासून बंद आहे. मुंबईकर चाकरमान्यांना ही गाडी सोयीची आहे. त्याचबरोबर सातारा व कोल्हापूर पॅसेंजर या वेळेवर धावत नाहीत. प्रवाशांना त्यामुळे मोठा मनस्ताप सहन करावा लागतोच; शिवाय पाच पट खर्चही करावा लागत असल्याने या गाड्या नियमित व वेळेवर धावाव्यात, अशी मागणीही या वेळी जेजुरी व नीरा येथील रेल्वे प्रवाशांकडून करण्यात आली आहे.जेजुरी हे तीर्थक्षेत्राचे ठिकाण असून तेथे खंडेरायाच्या दर्शनासाठी महाराष्ट्राबाहेरूनही भाविक येतात. यात आंध्र प्रदेश, कर्नाटक येथून येणाऱ्या भाविकांची संख्या ही मोठी आहे. हुबळी एक्स्प्रेस ही गाडी बाहेरून येथे देवदर्शनासाठी येण्यासाठी सोयीची असल्याने नेहमीच लोकमान्य टर्मिनस ते हुबळी एक्स्प्रेस येथे थांबल्यास सोयीचे होणार आहे. ती जेजुरी रेल्वे स्थानकात एक मिनिट थांबवली जावी, अशी मागणी नेहमी भाविकांकडून केली जात आहे. 

टॅग्स :Jejuriजेजुरीrailwayरेल्वेKhandoba Yatraखंडोबा यात्रा