शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

महापालिकेने निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक पैसे घेतल्यास टँकरला पाणी देणे बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 12:08 IST

उन्हाच्या वाढत्या तडाख्यामुळे शहरात सर्वच भागातून टँकरला प्रचंड मागणी वाढली आहे.

ठळक मुद्देसर्व टँकर पॉईटवर सिसिटीव्हीची नजर; टँकरच्या जीपीएसचे कंट्रोल महापालिकेतून पुणेकराकडून पाण्याच्या मागणीमध्ये सरासरी १५ ते २० टक्क्यांनी वाढ पाणी पुरवठा अधिका-यांची बैठक घेऊन तातडीने विविध उपाय-योजना करण्याचे आदेशशहराच्या विविध ७ ठिकाणी महापालिकेच्या वतीने टँकर भरणा केंद्र (पॉईट) निश्चितजीपीएस सिस्टीमचे कंट्रोल रुम प्रथमच महापालिकेच्या सावरकर भवन येथे सुरु टँकर चालकांनी नागरिकांना १३०० ते १५०० रुपयांपर्यंत टँकर देणे आवश्यक

पुणे : महापालिकेकडून येत्या दोन दिवसांत महापालिका, ठेकेदार आणि खाजगी टँकरचे दर निश्चित करण्यात येणार आहेत. त्यानंतर पाण्याच्या टँकरसाठी महापालिकेने निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक पैसे घेतल्यास संबंधित टँकरला पाणी देणे बंद करण्यात येणार असल्याचा निर्णय महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी घेतला आहे. तसेच शहरातील सर्व टँकर पॉईटवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत असून, शंभर टक्के टँकर जीपीएस यंत्रणेसोबत जोडण्यात आले आहेत. तसेच या जीपीएस सिस्टिमचा कंट्रोल प्रथमच महापालिका करणार आहे.    उन्हाच्या वाढत्या तडाख्यामुळे शहरात सर्वच भागातून टँकरला प्रचंड मागणी वाढली आहे. पुणेकराकडून पाण्याच्या मागणीमध्ये सरासरी १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यात सध्या महापालिकेकडून कवेळ एकवेळच आणि अत्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा करण्यात येतो. यामुळे अनेक मोठ्या सोसायट्यामध्ये पहिल्या मजल्यावर देखील पाणी चढत नाही. यामुळेच सध्या उपनगराबरोबरच मध्यवस्तीसह सर्वच भागातून टँकरच्या मागणीमध्ये मोठी वाढ झाली आहे. परंतु नागरिकांच्या गैरसोयीचा फायदा घेत टँकर माफीयांकडून पुणेकरांची लुट सुरु केली आहे. याबाबत लोकमतमध्ये वृत्त प्रसिध्द झाल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. त्यानंतर आयुक्त सौरभ राव यांनी पाणी पुरवठा अधिका-यांची बैठक घेऊन तातडीने विविध उपाय-योजना करण्याचे आदेश दिले.      याबाबत पाणी पुरवठा विभागाचे अधिक्षक अभियंता प्रवीण गेडाम यांनी सांगितले की, सध्या शहरामध्ये दररोज सरासरी ४०० ते ४५० टँकरद्वारे नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यामध्ये शहराच्या विविध ७ ठिकाणी महापालिकेच्या वतीने टँकर भरणा केंद्र (पॉईट) निश्चित करण्यात आले आहेत. या सर्व टँकर पॉईटवर सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. तर महापालिका, ठेकेदार आणि खाजगी टँकरला देखील जीपीएस यंत्रणा लावण्यात आली आहे. टँकरला लावण्यात आलेल्या जीपीएस सिस्टीमचे कंट्रोल रुम प्रथमच महापालिकेच्या सावरकर भवन येथे सुरु करण्यात आली आहे. यामुळे महापालिकेच्या टँकर पॉईटवर दररोज किती टँकर भरले जातात, भरलेला टँकर कुठे जातात यावर थेट नियंत्रण ठेवले जाणार आहे.--------------------------एका टँकरसाठी १३०० ते १५०० दर निश्चित करणारसध्या महापालिकेकडून पाण्याच्या एका टँकरसाठी ५२२ रुपये घेतले जातात. यामध्ये वाहतुकीचा दर सुमारे ९०० रुपये गृहीत धरण्यात आला आहे. त्यामुळे टँकर चालकांनी नागरिकांना १३०० ते १५०० रुपयांपर्यंत टँकर देणे आवश्यक आहे. परंतु टँकर माफियांकडून नागरिकांची लुट सुरु असून, तब्ब्ल २२०० ते २५०० रुपयांपर्यंत दर आकारले जात आहे. यामुळे येत्या दोन दिवसांत महापालिकेकडून टँकरचे दर निश्चित करण्यात येणार आहेत. यापेक्षा अधिक दर घेतल्यास संबंधित टँकर मालकावर ककड कारवाई करून पाणी देणे बंद करण्यात येणार आहे.- प्रवीण गेडाम, अधीक्षक अभियंता, पाणी पुरवठा विभाग     

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका