वाळू उपशातील गुन्हेगारी थांबवणार
By Admin | Updated: June 25, 2014 22:54 IST2014-06-25T22:54:00+5:302014-06-25T22:54:00+5:30
वाळू उपसा करणा:यांची गुन्हेगारी थांबविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

वाळू उपशातील गुन्हेगारी थांबवणार
>दौंड : दौंड तालुक्यात बेकायदेशीर वाळू उपसा करणा:यांची गुन्हेगारी थांबविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. हस्तक्षेप होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच,
तालुक्यात गेल्या काही वर्षापासून शासकीय पातळीवर झालेल्या
निकृष्ट कामांची चौकशी केली
जाईल. निकृष्ट कामांच्या संदर्भात कारवाईशिवाय दर्जेदार कामे
होणार नाहीत, असे शेवटी सुळे म्हणाल्या.
दरम्यान, दौंड येथील पंचायत समिती सभागृहात वीज आणि पाणी या प्रश्नावर सुप्रिया सुळे यांनी आढावा बैठक घेतली. सुळे म्हणाल्या की, बारामतीत भविष्यात पाण्याच्या संदर्भात योग्य तो निर्णय घेणो गरजेचे आहे. कारण, जून महिना संपत आला असून, पाऊस लांबला आहे. पाण्याचा वापर काटकसरीने होणो गरजेचे आहे. भीमा पाटसचे अध्यक्ष राहुल कुल म्हणाले की, तालुक्यातील विद्युत तारा जीर्ण झालेल्या आहेत.
तेव्हा काही ठिकाणी तारा तुटून या तारांच्या विजेच्या धक्क्याने 2-3 शेतकरी मृत्युमुखी पडलेले आहेत. तेव्हा तारा तुटल्यावर वीजपुरवठा बंद झाला पाहिजे. यावेळी विद्युत महावितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता नागनाथ इरवाडकर
म्हणाले की, विद्युत रोहित्रतील तांब्याच्या तारा 50 हजार रुपये किमतीच्या जवळपास असतात. भांडगाव येथे पाच नवीन उपकेंद्र सुरू करण्यात येणार असून याठिकाणी 21 कोटी रुपये अपेक्षित आहे.
शहरातील आणि ग्रामीण भागातील पाणीपुरवठय़ासंदर्भात या बैठकीत मोठय़ा प्रमाणावर तक्रारी करण्यात आल्या. यावर उपाय
योजना करण्याबाबत उपस्थित
अधिका:यांना सूचना देण्यात आल्या. तसेच, विद्युत महावितरण कंपनीचे अधिकारी बशीर सय्यद यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सत्कार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आला.
या वेळी उषा चव्हाण, शिवाजी दिवेकर, दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अप्पासाहेब पवार, शहराध्यक्ष अॅड. अजित बलदोटा, तहसीलदार उत्तम दिघे,
गटविकास अधिकारी संतोष हराळे, मुख्याधिकारी शिवाजी कापरे,
प्रवीण शिंदे, वैशाली नागवडे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. (वार्ताहर)
वाळूमाफियांचा बीमोड करणार
‘भीमा नदीच्या पात्रत वाळूमाफियांनी ग्रामस्थांना तलवारीने धमकावले’ या आशयाचे ‘लोकमत’चे वृत्त पंचायत समिती कार्यालयात सुप्रिया सुळे यांनी वाचून वाळूमाफियांच्या गुन्हेगारीबाबत आश्चर्य व्यक्त केले. ग्रामीण पोलीस अधीक्षक मनोज लोहिया यांच्याशी संपर्क साधून तालुक्यातील वाळूमाफियांच्या गुन्हेगारीवर आळा घालण्याच्या सुळे यांनी सूचना केल्या. वाळूमाफियांचा बीमोड केल्याशिवाय राहणार नाही, अशी खात्री मनोज लोहिया यांनी सुळे यांना दिली आहे.