कोरेगाव मूळ येथे घरांवर दगडफेक

By Admin | Updated: June 2, 2017 01:51 IST2017-06-02T01:51:40+5:302017-06-02T01:51:40+5:30

कोरेगाव मूळ येथील नागरिकांच्या घरांवर रात्रीअपरात्री गेल्या सात आठ महिन्यांपासून दगडफेक करून दारे खिडक्या बाहेरून

Stoning at houses at Koregaon basin | कोरेगाव मूळ येथे घरांवर दगडफेक

कोरेगाव मूळ येथे घरांवर दगडफेक

 लोकमत न्यूज नेटवर्क
कोरेगाव मूळ : कोरेगाव मूळ येथील नागरिकांच्या घरांवर रात्रीअपरात्री गेल्या सात आठ महिन्यांपासून दगडफेक करून दारे खिडक्या बाहेरून लावल्या जात असल्याने परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. याप्रकारची तक्रार कोरेगाव मूळ ग्रामस्थांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात केली होती. हे प्रकार अजूनही सुरू असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरेगाव मूळ येथील रहिवाशी आप्पासो कड, सचिन कड, नंदकुमार कड, विलास वाघ, बंडू कड व पांडुरंग कड यांनी केलेल्या तक्रारीनुसार गेल्या काही महिन्यांपासून समाजकंटक व्यक्तीकडून वस्तीतील घरांवर दगडफेक केली जात आहे. रात्री अपरात्री घरांची दारे, खिडक्या वाजविण्याचे प्रकार घडत आहेत. यामुळे घरातील तसेच वस्तीतील महिला, लहान मुले, वृद्ध व्यक्ती भयभीत आहेत. रात्री बेरात्री दगडफेक होत असल्यामुळे जीव मुठीत घेऊन रात्ररात्र जागत बसावे लागत आहे.
याबाबत उरुळी कांचन पोलीस ठाण्यात अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत. तरीदेखील दगडफेकीचे प्रकार चालूच आहेत. वस्तीतील काही कुटुंबांतील व्यक्तींची हृदय शस्त्रक्रिया झाली असल्याने त्यांना विश्रांतीची गरज आहे. मात्र रात्री होणाऱ्या या प्रकाराने परिसरातील लोक दडपणाखाली जगत असल्याने परिसरातील लोक दहशतपूर्ण वातावरणात आहेत.

Web Title: Stoning at houses at Koregaon basin