पेटत्या कच:याने आळंदीकरांचा श्वास गुदमरतोय!
By Admin | Updated: September 29, 2014 23:29 IST2014-09-29T23:29:40+5:302014-09-29T23:29:40+5:30
येथील ‘पीएमपी’ बस स्थानकाशेजारी इंद्रायणी नदीपात्रलगत आळंदी नगर परिषदेने टाकलेला कचरा पेटविल्यामुळे आळंदीकरांचा श्वास गुदमरत आहे.

पेटत्या कच:याने आळंदीकरांचा श्वास गुदमरतोय!
>आळंदी : येथील ‘पीएमपी’ बस स्थानकाशेजारी इंद्रायणी नदीपात्रलगत आळंदी नगर परिषदेने टाकलेला कचरा पेटविल्यामुळे आळंदीकरांचा श्वास गुदमरत आहे. रात्रीच्या वेळी धुराचे लोट हवेत पसरल्यामुळे नदीकिनारी राहणा:यांना याचा त्रस होत आहे. असे प्रकार वारंवार होत आहेत.
आळंदी बस स्थानकाशेजारी आळंदी नगरपरिषद कचरा टाकते. त्यामुळे ‘दरुगधी’चाही मोठा त्रस होता. कुजलेल्या कच:याच्या विषारी धुरामुळे खोकला, दमा, श्वसनाचे विकार वाढत आहेत. पावसामुळे कचरा पेटविण्याचे प्रकार बंद झाले होते; परंतु ऊन पडल्यामुळे आळंदीतील कचरा पुन्हा पेटू लागला आहे. रात्रीच्या वेळी शहरातील रस्त्यावर धुराचे लोट
पसरत आहेत.
आळंदी देवस्थानातर्फे नगर प्रशासनाला घनकचरा व्यवस्थापनासाठी पाच एकर जमीन देण्यात आली आहे. मात्र अद्याप तेथील प्रकल्प कार्यान्वीत न झाल्याने येथे कचरा टाकला जातो. देवाच्या आळंदीत येणा:या वारकरी भाविकांना प्रथम कच:याचे दर्शन व नंतर माऊलींच्या संजीवन समाधीचे दर्शन घ्यावे लागते, ही आळंदीकरांसाठी लाजिरवाणी गोष्ट असल्याची खंत सामाजिक कार्यकर्ते शरद मुरडे व सुलतानभाई शेख यांनी व्यक्त केली.
तीर्थक्षेत्र विकास आराखडय़ांतर्गत दोन महिन्यांपूर्वी कचराकुंडय़ा देण्यात आल्या आहेत. त्यादेखील कच:याने ओसंडून वाहत असल्यामुळे संपूर्ण कचरा रस्त्यावर येऊ लागला आहे. (वार्ताहर)
याबाबत मुख्याधिकारी विनायक औंधकर यांच्याशी संपर्क साधला
असता, त्यांनी कचरा पेटल्यामुळे आळंदीकरांना त्रस होत असल्याचे मान्य केले. ते म्हणाले, की हा कचरा वारंवार कोणी अज्ञात व्यक्ती
पेटवतो. याविषयी आम्ही यापूर्वी पोलिसांकडेही तक्रार दिली आहे. जाणूनबुजून असे प्रकार करणो गैर आहे. देवस्थाननने दिलेल्या पाच एकर जागेतील प्रकल्पाचे काम जोरात सुरू असून लवकरच येथील
कच:याची समस्या कायमची सुटणार आहे. आम्ही हा पेटवलेला कचरा तत्काळ उचलू किंवा तो तेथेच गाडून टाकून त्यावर मुरुमीकरण करू. हे काम दोन दिवसांत पूर्ण होईल.