पोटच्या बाळाला बेवारस सोडले
By Admin | Updated: March 11, 2015 00:55 IST2015-03-11T00:55:10+5:302015-03-11T00:55:10+5:30
पतीशी पटत नाही, या कारणावरून पोटच्या एकुलत्या एका मुलाला रेल्वे स्थानकाजवळ बेवारस सोडून देणाऱ्या महिलेला दोन दिवसांनी

पोटच्या बाळाला बेवारस सोडले
पुणे : पतीशी पटत नाही, या कारणावरून पोटच्या एकुलत्या एका मुलाला रेल्वे स्थानकाजवळ बेवारस सोडून देणाऱ्या महिलेला दोन दिवसांनी मायेचा पाझर फुटला. या दोन दिवसांत पोलिसांनीच दोन वर्षांच्या बाळाचा सांभाळ केला. या निर्दयी महिलेवर पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
ही २१ वर्षांची महिला ठाणे येथे राहते. ती मूळची जुन्नर येथील आहे. तिचा प्रेमविवाह झाला आहे. हल्ली पतीशी तिचे पटत नाही. मुलाचा सांभाळ आपल्याकडून होणार नाही असे वाटून ती गेल्या महिनाअखेर बाळाला घेऊन रेल्वेने पुण्यात आली.
शिवाजीनगर रेल्वे फलाटावर उतरुन तिने बाळास सोडून पोबारा केला. मामेभावाकडे दोन दिवस राहिली. या दरम्यान पोलिसांंना बेवारस अवस्थेत असलेल्या या बाळाची माहिती समजली होती. त्यांनी त्याचा काही वेळ सांभाळ करून अनाथ संस्थेत दाखल केले. (प्रतिनिधी)