शहरं
Join us  
Trending Stories
1
गो इंडिगोच्या दिल्ली-वाराणसी फ्लाईटमध्ये अफरातफरी; प्रवाशांनी खिडक्यांमधून उड्या मारल्या...
2
आजचे राशीभविष्य - 28 मे 2024; कुटुंबियांसोबत मतभेद संभवतात, आर्थिक देवाण-घेवाण अथवा गुंतवणूक करताना सावध रहा
3
मुंबई महानगरपालिकेच्या कोस्टल रोडच्या बोगद्यातून झिरपले पाणी; सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
4
डोंबिवली स्फोटाप्रकरणी दोषींवर होणार कारवाई; कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे आश्वासन
5
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: चंद्रपुत्र, विष्णुरुपी बुध करतो भाग्योदय; पाहा, प्रभावी मंत्र-उपाय
6
गुरु उदय: ६ राशींवर गुरुकृपा, परदेशातून उत्तम लाभ; उत्पन्न वाढीचे योग, इच्छापूर्तीचा काळ!
7
तिन्हीसांजेला ‘ही’ कामे अवश्य करा, होईल लक्ष्मीची अपार कृपा; धनवैभव, सुख-समृद्धीचा लाभ!
8
मुंबईतील मॉल्सची झाडाझडती; राजकोट येथील घटनेनंतर मुंबई अग्निशमन दल अलर्ट मोडवर
9
स्फोटाचे बळी नेमके किती? ११, १२ की १३? डोंबिवलीतील यंत्रणांमध्ये एकवाक्यता नाही!
10
दहावीत यंदाही मुलींनीच मारली बाजी; पण २ लाख मुली दहावीपर्यंत पोहोचल्याच नाहीत!
11
महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक
12
दीड वर्षाच्या बाळाची जन्मदात्यांनीच केली विक्री; साडेचार लाखांचा सौदा, सहा जणांना अटक
13
दहावी निकाल: मुंबई विभागाचा टक्का वधारला; दोन टक्क्यांनी झाली वाढ, उत्तीर्णतेत मुलींची सरशी
14
समृद्धीचा शेवटचा टप्पा ऑगस्टमध्ये खुला होणार; MSRDC कडून शेवटच्या टप्प्यातील कामे सुरू
15
दहावी निकाल: मुंबई विभागात ८ विद्यार्थ्यांना १०० % गुण; ९० टक्के मिळविणाऱ्यांचे प्रमाणही वाढले
16
ससूनच्या डॉक्टरांनी ३ लाखांसाठी बदलले ‘बाळा’च्या रक्ताचे नमुने; दोन्ही डॉक्टरांना अटक
17
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
18
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
19
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
20
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप

हाय-फाय लाईफस्टाईलसाठी चोरल्या ४५ दुचाकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2018 2:21 AM

१२ दुचाकी हस्तगत; कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्याचा प्रताप; कोकणात जाऊन विकायचा गाड्या

पुणे : हाय-फाय लाईफस्टाईल जगण्यासाठी कृषी महाविद्यालयात शेवटच्या (चौथ्या) वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्याने शहरातून तब्बल ४५ दुचाकी चोरल्या आहेत. यातील साडेपाच लाख रुपये किमतीच्या बारा दुचाकी हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.अमरनाथ ज्ञानदेव घुलेश्वर (वय २१, रा. मु. पो. खळी, ता. गंगाखेड, जि. परभणी) असे अटक आरोपीचे नाव आहे. घुलेश्वर याला स्टायलिश राहण्याची सवय लागली होती. मात्र त्यासाठी पुरेसे पैसे नसल्याने तो दुचाकी चोरत व त्या विकत. संघटित गुन्हेगारी पथकातील हवालदार संतोष क्षीरसागर यांना खबऱ्याकडून अमरनाथ घुलेश्वर शहरातील विविध परिसरांतून वाहने चोरत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने कोंढवा, हडपसर, कात्रज, देहू रस्ता, तसेच सायन (मुंबई), पनवेल, ठाणे या परिसरातून वाहनचोरीचे ४५ पेक्षा जास्त गुन्हे केल्याची कबुली दिली. तो चोरीची वाहने बायरोडने चिपळूण, रत्नागिरी येथे घेऊन जात होता. त्या ठिकाणी तो वाहनांची विक्री करीत होता. ग्राहकाने कागदपत्रांची मागणी केल्यास कागदपत्रे हरवली आहेत किंवा आणून देतो असे सांगत होता. त्याच्याकडून कोंढवा पोलीस ठाण्यातील एक, स्वारगेट पोलीस ठाण्यातील एक, देहूरोड पोलीस ठाण्यातील एक, पनवेल शहर व नवी मुंबई पोलीस ठाण्यातील चार, पाटण पोलीस ठाण्यातील दोन, वागळे इस्टेट पोलीस ठाण्यातील (ठाणे) दोन व सायन पोलीस ठाण्यातील एक असे बारा गुन्हे उघडकीस आले आहेत. वाहनांचे पेट्रोल संपल्यावर काही वाहने त्याने रस्त्यातही सोडलेली आहेत. तर वाहन चोरताना सीसीटीव्ही फुटेज आल्याचे समजताच ते वाहनही तो सोडून देत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, सहायक पोलीस आयुक्त समीर शेख, गुंडा स्कॉडचे पोलीस निरीक्षक राम राजमाने, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, उत्तम बुदगुडे व पोलीस कर्मचारी संतोष क्षीरसागर, सर्फराज शेख, प्रशांत पवार, शकील शेख, सुनील चिखले, नीलेश शिवतरे, रमेश चौधर, विजय गुरव, राकेश खुणवे, किरण ठवरे, प्रवीण पडवळ, कैलास साळुके, संभाजी गंगावणे यांच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपीस न्यायालयात हजर केले असता सरकारी वकील संजय दीक्षितयांनी पोलीस कोठडीचीमागणी केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एस. मतकर यांनी आरोपीस १५ सप्टेंबरपर्यंत कोठडी सुनावली आहे.अ‍ॅप्लिकेशनवरून घेत वाहनाची माहितीघुलेश्वर वाहनांच्या बनावट चावीने चोरी करीत. त्याच्याजवळ आठ बनावट चाव्या मिळून आल्या आहेत. तो दुचाकी चोरल्यानंतर मोबाइलमधील वाहन इन्फो अ‍ॅपवर गाडीचा नंबर टाकत असे. तेथून वाहनाचे मॅन्युफॅक्चरिंग वर्ष व इतर माहिती काढून घेत होता.ओएलएक्सवर विक्रीसाठी असलेल्या वाहनाचा क्रमांक तो चोरलेल्या गाडीवर टाकून तिचीविक्री करीत होता. गेल्या वर्षभरापासून हा प्रकार सुरू होता.

टॅग्स :theftचोरीbikeबाईकPuneपुणे