शहरं
Join us  
Trending Stories
1
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
2
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
3
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
4
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
5
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
6
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
7
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
8
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
9
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
10
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
11
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
12
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
13
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
14
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
15
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
16
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
17
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
18
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
19
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
20
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण

बारामती शहरातून चोरी केलेल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:10 IST

चित्रपटात शोभणारी स्टंटबाजी बारामती तालुका पोलिसांची जिगरबाज कामगिरी जेजुरी : बारामती शहरातून सोमवारी (दि.१७) रात्री चोरीला गेलेल्या ट्रकसह आरोपी ...

चित्रपटात शोभणारी स्टंटबाजी

बारामती तालुका पोलिसांची जिगरबाज कामगिरी

जेजुरी : बारामती शहरातून सोमवारी (दि.१७) रात्री चोरीला गेलेल्या ट्रकसह आरोपी जेरबंद करण्यात बारामती तालुका पोलिसांना यश आले आहे. चोरीला गेलेल्या ट्रकची माहिती पोलिसांना त्यातील ‘जीपीएस’ सिस्टीमद्वारे मिळाली. त्यानंतर सुरू झाला चित्तथरारक पाठलाग. यावेळी आरोपीने बारामती-पुणे मार्गावर सासवडपर्यंत चित्रपटात शोभणारी स्टंटबाजी केली. मात्र, जिगरबाज पोलिसांमुळे तो ट्रक चोरी करण्यात अपयशी ठरला.

‘जीपीएस’द्वारे ट्रकची माहिती मिळाल्यावर तालुका पोलिसांनी मोरगाव मार्गावर ट्रकला अडविण्यासाठी काही वाहने रस्त्यावर आडवी लावण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर काही पोलिस मित्रांसह ट्रकचा पाठलाग सुरू केला. ट्रक ‘झिगझॅग’ पद्धतीने वेगाने चालवत आरोपीने रस्त्यावर आडवी लावलेले पिकअप वाहन ट्रकने उडवले. अतिशय थरारक पध्दतीने ट्रक कुणालाही ‘ओव्हरटेक’ न होण्याची दक्षता घेत आरोपीने ट्रक जेजुरी, सासवडच्या दिशेने नेला. अडवण्याचा प्रयत्न केल्यास सरळ अंगावर ट्रक घालण्याचा त्याने सपाटाच सुरू ठेवला. त्यामुळे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले.

तोपर्यंत याबाबतची माहिती जेजुरी पोलीस ठाण्याला मिळाली. जेजुरी पोलीस स्टेशनची हद्दीत जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई शेंडे पोलीस मित्र नाना पोलीस मित्र व संजय खोमणे यांनी पाठलाग सुरू केला. मात्र, आरोपीने कोणालाही जुमानले नाही. अतिशय बेफिकीर पद्धतीने आरोपीने ट्रक अनियंत्रितपणे चालविणे सुरूच ठेवले. बारामती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी स्वत: पोलीस निरीक्षक महाडिक यांच्याशी बोलून घटनेचे माहिती दिली. निरीक्षक महाडिक यांनी सदर घटनेचे गांभीर्य ओळखून स्वत: मोरगाव चौकात थांबून जेजुरीतील मोरगाव चौकांमध्ये नाकाबंदी केली. यावेळी ट्रक अडविण्यासाठी पोलिसांनी मोरगावचा अनुभव पाहता येथे मोठी दक्षता घेतली. पोलिसांनी चक्क अवजड दोन वाहने रस्त्यावर लावून ट्रकची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, बेफाम निघालेला ट्रक मोरगाव चौकात आला. उजवीकडे जाऊन सरळ तो ट्रक आडव्या लावलेल्या ट्रकवर घातला. तसेच रस्त्यालगतचे सलून व हॉटेलचा भाग उडवला. यावेळी जोरदार धडक दिल्याने ट्रक पलटी होता होता बचावला. परत त्यानंतर त्याच वेगाने सासवड रस्त्यावर आला. आरोपीच्या या पोलिसांना देखील न जुमानणा-या वृत्तीने आता पोलिसांच्या काळजाचा ठोका चुकला होता. मात्र, त्याची तमा न बाळगता त्यांनी पाठलाग सुरूच ठेवला. पोलिसांना आरोपीचे मानसिक नियंत्रण सुटल्याचा, तसेच तो नशेत असल्याचा संशय आला. पोलिसांनी प्रसंगावधान राखून पोलीस निरीक्षक महाडिक चालक संजय धमाल नांदे मुत्तनवार तसेच जेजुरीस नेमणुकीस असलेले ४ ते ५ होमगार्ड यांनी पाठलाग सुरू केला. सासवडलासुद्धा नाकाबंदी लावली लावण्यात आली. ट्रक कुणालाही पुढे जाऊ देत नसतानाच दुहेरी रस्ता सुरू झाला. त्यानंतर पोलिसांनी १२० च्या वेगात त्या ट्रकला लांबून ओव्हरटेक केले. सासवडच्या अलीकडे एकेरी रस्ता, अरुंद पूल असणा-या ठिकाणी परत हेवी ट्रक अडवून त्या रस्त्याला आडवे लावले. बारीक चारचाकी वाहने व दुचाकी वाहने बाजूला केली. संबंधित ट्रकचालक परत जवळ आला. त्याने परत ट्रक रस्त्यावर आडवे लावल्याचे पाहिले. यावेळी मात्र पोलिसांना यश आले. आरोपीने ट्रक सोडून दिला. क्लिनर साईड ट्रकमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस पाठीमागे असणा-या लोकांनी व बारामती तालुका पोलिसांनी त्याला पकडले. संतप्त जमावाच्या मारहाणीपासून आरोपीला वाचवत जेजुरी पोलिसांनी त्याला बाहेर काढून प्रथम सासवड पोलीस स्टेशनला आणले. त्यानंतर बारामती तालुका पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

———————————————

...अनेकांचा अपघाती बळी जाण्याची भीती होती

चोरीला गेलेला ट्रक पकडताना पोलिसांनी रस्त्यावरील इतरांचा अपघात होणार नाही, याची दक्षता घेतली. तसेच अपघात होऊ न देता ताब्यात घेतला. हा ट्रक पुढे सासवड आणि पुणे या ठिकाणी गेल्यावर अनेकांचा अपघाती बळी जाण्याची भीती होती. पोलिसांच्या कामगिरीमुळे मोठा अनर्थ टळला. पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते यांना माहिती देण्यात आली. हे थरारनाट्य रात्री १० वाजल्यापासून १२ वाजून १० मिनिटांपर्यंत सुरू होते.

पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, बाबा नाजरकर असे आरोपीचे नाव आहे. हा आरोपी मूळ दाफेगाव (जि. जालना ) येथील असून सध्या बारामती तांंदूळवाडी भागात वास्तव्यास आहे. त्याने अमोल गुरव यांच्या मालकीचा (एमएच ४२ एक्यु ३६००) हा ट्रक चोरून नेला होता. मोरगावमध्ये पिकअप, तर जेजुरीत त्याला अडविण्यासाठी लावलेला कंटेनर पाहून त्याने दुकान फोडून फरार होण्याचा प्रयत्न केला. सासवडमध्ये त्याने चालत्या वाहनातून उडी मारली. यावेळी पोलीस कर्मचारी विजय वाघमोडे, नंदू जाधव यांनी त्याला पकडले. हा आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार नसल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.