शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

जिद्दीने खेचले यश, मजुरापासून तहसीलदार होण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 10:08 IST

ध्येयासाठी पेटून उठलेल्या व्यक्तीला परिस्थिती कधीही हरवू शकत नाही, याचा प्रत्यय पुण्यातील सागर ढवळेकडे बघून येतो.

ठळक मुद्देजिद्दीने खेचले यश, मजुरापासून तहसीलदार होण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास केटरिंगमध्ये वाढण्यापासून ते वाळूची गाडी भरण्यापर्यंत काम केले, चांगले काम करणार असल्याचा मनोदय

पुणे : ध्येयासाठी पेटून उठलेल्या व्यक्तीला परिस्थिती कधीही हरवू शकत नाही, याचा प्रत्यय पुण्यातील सागर ढवळेकडे बघून येतो. परिस्थितीअभावी महागडे क्लास तर लांबच पण मर्यादित पुस्तकांचा अभ्यास करणाऱ्या, प्रसंगी वाळू उचलणारा मजूर म्हणून काम करणाऱ्या सागरची तहसीलदार होण्याची कथा प्रेरणादायीच नाही तर स्तिमित करणारी देखील आहे. 

    सागरचे मूळ गाव शिरूर तालुक्यातील चिंचणी. १२वीपर्यंतचे शिक्षण गावाकडेच पूर्ण केल्यावर त्याने पुण्यातील कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्याचवेळी सोबतच्या मित्र मैत्रिणींसोबत राज्यसेवा परीक्षेची तयारी सुरु केली.मात्र घरातली परिस्थिती हलाखीची असल्याने त्याला शिक्षण घेतानाही काम करणे भाग होते. लहानपणापासून कष्टाची सवय असल्याने त्याने मिळेल तिथे काम केले. अगदी विविध केटरिंगमध्ये वाढण्यापासून ते वाळूची गाडी भरण्यापर्यंत कुठलेही काम त्याला वर्ज्य नव्हते. घरी आजारी वडील आणि शेतात मजुरी करणाऱ्या आईसाठी त्याला हे काम करावे लागले. गेले दोन वर्ष त्याचे हे कष्ट सुरु आहेत. बुधवारी रात्री उशिरा लागलेल्या महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षेच्या निकालाने त्याची तहसीलदार म्हणून निवड झाली. 

   त्याला डीवायएसपी होण्याची इच्छा होती मात्र मिळालाय त्यातही तो समाधानी आहे. तो त्याच्या आईला आयुष्याची प्रेरणा मानतो. मी तहसीलदार झालो म्हणजे नेमकं काय झालं हे तिला माहिती नसलं तरी सरकारी अधिकारी झालो हे तिच्या लक्षात आल्याचे त्याने सांगितले. मी यासाठी खूप कष्ट सोसले आहेत, अशी वेळ कोणावरच येवू नये अशी त्याची प्रांजळ इच्छा आहे. यापुढे चांगले काम करणार असल्याचा मनोदयही त्याने व्यक्त केला. 

टॅग्स :Puneपुणेeducationशैक्षणिकMPSC examएमपीएससी परीक्षा