शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
Horoscope Today: आजचे राशीभविष्य- ०८ जुलै २०२५, मनासारखे यश मिळेल, अपूर्ण कामे पूर्ण होतील!
3
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
4
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
5
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
6
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
7
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
8
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
9
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
10
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
11
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
12
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
13
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
14
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
15
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
16
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
17
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
18
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
19
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...

कोंबड्यांच्या खुराड्यात अडकला बिबट्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 00:51 IST

ओतूरजवळील चार पडाळी येथील किरण अहिनवे यांच्या घराजवळ कोंबड्यांचे खुराडे आहे.

ओतूर : येथील चार पडाळी वस्तीवरील किरण अहिनवे यांच्या घराजवळ सुमारे दहा-बारा कोंबड्यांच्या बंदिस्त खुराड्यात मंगळवारी बिबट्या घुसला. त्याने सर्व कोंबड्या फस्त केल्या. मात्र, खुराड्यातून बाहेर न पडता आल्याने बिबट्या खुराड्यातच अडकला. या घटेनेची माहिती वन विभागाला देण्यात आल्यावर माणिकडोह बिबट्या निवारण केंद्राच्या पथकाने बिबट्याला जेरबंद केले.

ओतूरजवळील चार पडाळी येथील किरण अहिनवे यांच्या घराजवळ कोंबड्यांचे खुराडे आहे. मंगळवारी पहाटे भक्ष्याच्या शोधात फिरणाऱ्या बिबट्याने खुराड्याची लोखंडी तारेची जाळी तोडून खुराड्यात प्रवेश करून कोंबड्या फस्त करू लागला. तेव्हा इतर कोंबड्या कलकलाट करू लागल्या. त्यांच्या आवाजाने किरण अहिनवे यांचे वडील जागे झाले. त्यांनी सुनेला कोंबड्यांना खाद्य टाकण्यास सांगितले. सून खुराड्याजवळ गेली तेव्हा त्या दरवाजा उघडणार तेवढ्यात बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. खुराड्याचा दरवाजा बंद असल्याने त्या बचावल्या. त्यांनी घाबरत थेट घरात जाऊन खुराड्यात बिबट्या असल्याचे सांगितले. घरच्यांनी खुराड्याची पाहणी केली असता. त्यात बिबट्या दिसला. त्यांनी तातडीने ही माहिती वन विभागाला कळवली.वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी बापू बेळे यांनी ही माहिती माणिकडोह बिबट निवारा केंद्राचे डॉ. अजय देशमुख यांना कळविले. तसेच स्वत: व वनपाल चैतन्य कांबळे, मोढवे, वनरक्षक जराड, पवार यांच्यासह अहनिवे यांच्या घरी हजर झाले. डॉ अजय देशमुख, डॉ. महेंद्र ढोले यांचे पथकही घटनास्थळी पोहचले. डॉ. देशमुख यांनी पिंजºयातील बिबट्याला भुलीचे इंजेक्शन दिले. बिबट्या बेशुद्ध झाल्यावर त्याला खुराड्यातून बाहेर काढून पिंजºयात टाकून त्याला बिबट निवारा केंद्रात पाठविण्यात आले. या बिबट्याचे वय सुमारे अडीच वर्षे आहे.राजुरीत दोन कालवडी, दोन शेळ्या ठारराजुरी : परिसरात बिबट्याने दोन कालवडी, दोन शेळ्या व एका मेंढीवर हल्ला करून ठार केले आहे. ही घटना सोमवारी घडली. राजुरी (ता. जुन्नर) येथील आबाटेक रोड मळ्यामधील बबन खंडू औटी यांनी आपल्या पाळीव कुत्र्याला आपल्या दारासमोरील गोठ्यात बांधले होते. रात्री एकच्या सुमारास त्यांना जनावरांचा ओरडण्याचा आवाज आला. ते घराबाहेर आले असता त्यांना बिबट्याने कालवडीला ठार करून तिला फरफटत उसाच्या पिकात नेत असल्याचे दिसले. त्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या पळून गेला.दुसºया झालेल्या घटनेत याच गावातील गुरव शेतमळ्यातील सुदाम औटी यांच्या घराजवळच १० ते १२ गाई असलेला मोठा गोठा आहे. सोमवारी मध्यरात्री २ च्या सुमारास त्यांना कुत्र्याचा ओरडण्याचा आवाज आला. ते बॅटरी व काठी घेऊन गोठ्याजवळ गेले असता, त्यांना बिबट्याने कालवडीवर हल्ला करून तिला ठार केल्याचे दिसले. त्यांनी मोठ्याने आरडाओरडा केल्याने बिबट्या कालवडीला सोडून पळून गेला. सुदैवाने बिबट्याने त्यांच्या वर हल्ला केला नाही. तिसºया घटनेत याच गावात उंचखडक रस्त्यावर एका ठिकाणी थांबलेले विलास मोरे या मेंढपाळाच्या दोन मेंढ्या व एक शेळी बिबट्याने मारून टाकल्या आहेत. घटनास्थळी वनखात्याचे जे. बी. सानप, तसेच कर्मचाºयांनी भेट देऊन पंचनामा केला. या वेळी त्यांना बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळले. वनखात्याने या ठिकाणी पिंजरा लावावा, अशी मागणी पंचायत समितीचे माजी सभापती दीपक औटी व गावचे सरपंच ज्ञानेश्वर शेळके यांनी केली आहे. 

टॅग्स :Puneपुणे