३५ हजार कुत्र्यांची नसबंदी

By Admin | Updated: February 5, 2015 00:23 IST2015-02-05T00:23:23+5:302015-02-05T00:23:23+5:30

शहरातील कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केल्यापासून गेल्या ५ वर्षांत ३५ हजार कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

Sterilization of 35 thousand dogs | ३५ हजार कुत्र्यांची नसबंदी

३५ हजार कुत्र्यांची नसबंदी

पुणे : शहरातील कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात केल्यापासून गेल्या ५ वर्षांत ३५ हजार कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील कुत्र्यांच्या प्रजनन दरात मोठी घट झाली आहे. मात्र, सध्या शहरात असलेल्या भटक्या कुत्र्यांचे आयुष्यमान विचारात घेता त्यांच्या त्रासापासून सुटका करण्यासाठी ३ ते ४ वर्षे वाट पाहावी लागणार आहे.
भटक्या कुत्र्यांचा त्रास सहन करावा लागत असल्याच्या असंख्य तक्रारी होत्या. महापालिकेच्या मुख्यसभेतही यावर अनेकदा चर्चा झाली होती. मात्र, कायद्यानुसार भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यावर अनेक निर्बंध असल्याने त्यावर मर्यादा येत होत्या. त्यानुसार कुत्र्यांना मारता येत नाही इतकेच नाही, तर त्यांना एका ठिकाणाहून उचलून दुसऱ्या ठिकाणी सोडताही येत नाही. यापार्श्वभूमीवर भटक्या कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया करून त्यांना पुन्हा जेथून उचलले तिथे नेऊन सोडणे एवढेच प्रशासनाला करता येणे शक्य होते. त्यानुसार पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने २०१० पासून कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया करण्यास सुरुवात करण्यात आली. पहिल्या२०१०-११ या वर्षात ६ हजार कुत्र्यांवर शस्त्रक्रिया झाली, त्यानंतर २०११-१२ मध्ये ९ हजार, २०१२-१३ मध्ये ८ हजार, २०१३-१४ मध्ये १० हजार कुत्र्यांवर नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आली.

वर्षेशस्त्रक्रिया
२०१०-११५७२०
२०११-१२८८२५
२०१२-१३८३८०
२०१३-१४१००००
२०१४-१५(जाने.)२२००
एकूण३५१२५

४शहरातील भटक्या कुत्र्यांची नेमकी संख्या किती, याबाबत निश्चित आकडेवारी उपलब्ध नसली, तरी साधारणत: निम्म्यापेक्षा जास्त कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्यात प्रशासनाला यश आले आहे.
४त्यामुळे शहरातील कुत्र्यांच्या प्रजनन दरात मोठी घट झाली आहे. कुत्र्यांच्या पिलांची संख्या कमी झाली आहे.
४कुत्री साधारणत: १५ ते २० वर्षे जगतात, त्याचा विचार करता भटक्या कुत्र्यांचा त्रास कमी होण्यासाठी आणखी ३ ते ४ वर्षे वाट पाहावी लागणार आहे.

४सध्या भटक्या कुत्र्यांवर नायडू हॉस्पिटल व केशवनगर येथील ब्ल्यू क्रॉस सोसायटीच्या केंद्रात नसबंदी शस्त्रक्रिया केली जात आहे. तिथे एका दिवसात सरासरी ३५ ते ४० कुत्र्यांवर शस्त्रक्रिया केली जाते. येत्या काही दिवसांत बाणेर, कोंढवा येथे आणखी हॉस्पिटल उभारले जाणार असून, त्यामुळे भटक्या कुत्र्यांवर शस्त्रक्रिया करण्याच्या क्षमतेमध्ये मोठी वाढ होणार आहे,अशी माहिती सहायक आरोग्यप्रमुख अंजली साबणे यांनी दिली.

Web Title: Sterilization of 35 thousand dogs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.