सलग दुसऱ्या दिवशी वाळू ट्रकची चोरी
By Admin | Updated: December 24, 2016 00:16 IST2016-12-24T00:16:59+5:302016-12-24T00:16:59+5:30
दौंडच्या प्रशासकीय इमारतीच्या आवारातून बेकायदेशीर वाळूचा ट्रक वाळूमाफियांनी पळवला असल्याने एकच खळबळ उडाली

सलग दुसऱ्या दिवशी वाळू ट्रकची चोरी
दौंड : दौंडच्या प्रशासकीय इमारतीच्या आवारातून बेकायदेशीर वाळूचा ट्रक वाळूमाफियांनी पळवला असल्याने एकच खळबळ उडाली आहे. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास ३ वाळूचे ट्रक वाळूतस्करांनी महसूल खात्याच्या ताब्यातून गेटचे कुलूप तोडून पळविले होते.
ही घटना ताजी असताना गुरुवारी मध्यरात्रीला एक वाळूचा ट्रक (एमएच १२ सीटी ४५२१) पळविला आहे. एकंदरीतच ट्रकचोरीच्या सत्राबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी तहसील खात्याच्या वतीने पोलिसांना तक्रार देण्यात आली आहे. (वार्ताहर)